इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सनदी अधिकारी डॉ. प्रविण गेडाम उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत. त्यांना फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळेच ते हार्वर्ड विद्यापीठात सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर शिक्षण (मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ) सुरु केले आहे. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत ते उच्च शिक्षण घेणार आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रात परतणार आहेत.
गेल्या सहा वर्षांपासून ते राजधानी दिल्लीत आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्षतेची दखल घेत मोदी सरकारने त्यांना केंद्रात नियुक्ती दिली. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. जळगावचा घरकुल घोटाळा उघडीस आणणे तसेच नाशिकमधील अनियमित बांधकाम प्रश्नी कारवाई यामुळे ते राज्यभरात चर्चेला आले. सध्या ते हार्वर्ड विद्यीपीठात शिक्षण घेत आहेत. जून २०२३ मध्ये ते राज्य सरकारच्या सेवेत दाखल होणार आहेत.
https://www.facebook.com/584214336/posts/pfbid033wHSpX9QN9yYUnD2HcBRH7BD1afS9BuQGW9po9NMNNU1RqjBa88K541xgXAFpf6il/
IAS Officer Dr Pravin Gedam Foreign Education