इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजकीय नेत्याप्रमाणे काही वेळा शासकीय अधिकारी देखील बेताल वक्तव्य करतात आणि त्याचे वाईट परिणाम होतात. बिहारमध्ये देखील एका सनदी महिला अधिकाऱ्याने असेच अकलेचे तारे तोडले. एका विद्यार्थिनींनी सॅनिटरी पॅड मोफत देण्याच्या मागणी केली असता, या महिला अधिकाऱ्याने तुम्हाला सगळेच फुकट हवे का? उद्या निरोधही फुकट मागाल? असे म्हटल्याने मोठी खळखळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर या महिला आयएएस अधिकाऱ्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
सरकारच्या योजना सांगण्यासाठी शासकीय अधिकारी देखील वारंवार जनतेशी संवाद साधतात, त्यासाठी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून शासनाच्या योजनेची माहिती देत असतात. परंतु राजकीय नेते अनेकदा बेताल वक्तव्य करून खळबळ उडून देतात. शासकीय अधिकाऱ्यांना मात्र असे करता येत नाही, त्यांना विचारपूर्वक आणि माहिती घेऊनच बोलावे लागते. मात्र काही अधिकाऱ्यांचा बोलताना तोल जातो आणि त्यातून वादंग निर्माण होते. एका महिला सनदी अधिकाऱ्यांने असेच बेताल वक्तव्य केल्याने आता त्या विषयीवर संताप व्यक्त होत आहे.
पाटणा येथे युनिसेफ सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल अंतर्गत महिला आणि बाल विकास महामंडळाने ‘सशक्त बेटी समृद्धी बिहार’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाला महिला विकास महामंडळाच्या मुख्य अधिकारी हरजोत कौरप्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. तेव्हा यातील काही विद्यार्थिंनीनी विविध प्रश्न विचारले. एका विद्यार्थिनीने त्यांना शासनाकडून मोफत सॅनिटरी पॅड देण्याबाबत प्रश्न विचारला.
त्या विद्यार्थिनीने त्यांना विचारले की, सरकार नागरिकांना अनेक गोष्टी देते. तसेच शालेय मुलांना गणवेश, शिष्यवृत्ती देण्यात येते. मग मुलींना केवळ २५ रुपयांचे सॅनिटरी पॅड का मोफत देऊ शकत नाही ? यावेळी विद्यार्थिनीच्या या प्रश्नाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिचे कौतूकही केले. मात्र त्या विद्यार्थिनीच्या या प्रश्नाला उत्तर देताना हरजोत कौर यांनी म्हणाल्या की, तुमच्या अशा या मागण्या वाढतच जातात? त्यांना काही अंतच दिसत नाही? सरकार २० रुपयांचे सॅनिटरी पॅडही देऊ शकते, आणखी उद्या मागणी केली तर जीन्स-पॅन्टही मिळू शकते. पुन्हा दुसऱ्या दिवशी सुंदर चप्पल मागितले तेही देऊ शकतो. आणि जर उद्या कुटुंब नियोजनाच प्रश्न आला? तर कंडोमही फुकटच द्यावे लागेल, मग सगळे फुकट घेण्याची तुम्ही सवय का लावून घेता? असा प्रति सवालही कौर यांनी केला.
दरम्यान, त्यांच्या या उत्तरामुळे सभागृहात शांतता पसरली आणि कुजबूज सुरू झाली. एखादी महिला अधिकारी, असे भेटतात वक्तव्य कसे करू शकते. याची चर्चा सुरू झाली. इतकेच नव्हे तर काहींनी त्याचे व्हिडिओ देखील लगेच व्हायरल केले, आणि संतप्त प्रक्रिया प्रतिक्रिया येऊ लागल्या. विशेष म्हणजे हरजोत कौर यांनी पुढे सांगितले की, सरकारकडून सर्व फुकट घेण्याची का गरज आहे ? स्वत:ला इतके मोठे व समृद्ध करा की, सरकारकडून काहीही घेण्याची गरज लागणार नाही. सरकार खूप काही देत आहे, म्हणून फुकट घेऊ नका. त्यांच्या या उत्तरावर विद्यार्थिनी म्हणाल्या की, सरकार मत मागण्यासाठी येते. तेव्हा त्या म्हणाल्या की ,तुम्ही देऊ नका मतदान, मग आपल्याला पाकिस्तानसारखे व्हावे लागेल, त्यांनी असे विधान केल्याने मग विद्यार्थिनींना काय बोलावे हे समजेना.
IAS Officer Controversial Statement on Sanitary Pad and Condom