पुणे (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – आपण मोठे अधिकारी व्हावे, सरकारी नोकरी मिळून खूप पैसा कमवा नावलौकिक मिळावावा, असे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न असते, यासाठी दरवर्षी देशातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मात्र, यातून अयशस्वी होणारे असे हजारो तरुण आहेत. पण आपण आज अशी जबरदस्त यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.
दरवर्षी लाखो विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देतात. परंतु अनेक विद्यार्थी नापास होतात किंवा त्यांना कमी गुण मिळतात. अशा परिस्थितीत खराब कामगिरी आणि अपयशामुळे विद्यार्थी निराश राहतात. मात्र छत्तीसगडच्या आयएएस अधिकाऱ्याची यशोगाथा अशा उमेदवारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर त्यांचा संघर्ष प्रवास अशा वेळी शेअर केला जेव्हा अनेक मुले त्यांचा निकाल खराब असल्याने निराश झाले आहेत.
https://twitter.com/AwanishSharan/status/1550451005346566144?s=20&t=82I7GFJTzciUHFHvU9QArA
अवनीश शरण यांनी ट्विटरवर आपल्या संघर्षाचा प्रवास सांगितला आहे. वास्तविक, दहावी, बारावी बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी नापास झाले, तर काहींना कमी गुण मिळाले. अशा परिस्थितीत निराशेच्या या क्षणी आयएएस अधिकाऱ्याने आपली कहाणी सांगून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. अवनीश यांनी ट्विट केले की, ‘माझा प्रवास: 10वीमध्ये 44.7 टक्के, 12वीमध्ये 65 टक्के, ग्रॅज्युएशनमध्ये 60 टक्के. CDS मध्ये नापास, CPF मध्ये नापास. राज्य लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेत 10 पेक्षा जास्त वेळा नापास झाला होतो.
विशेष म्हणजे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचलो. दुसऱ्या प्रयत्नात अखिल भारतीय 77 क्रमांक मिळवला. अवनीश शरण यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मुलांना विचारले होते की, बारावीत तुम्हाला किती टक्के मार्क्स आले? यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आपली कहाणी सांगितली. आयएसएस अधिकारी अवनीश शरण यांच्या या ट्विटला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत.
https://twitter.com/AwanishSharan/status/1547417338353291267?s=20&t=82I7GFJTzciUHFHvU9QArA
अवनीश हे सन 2009 च्या बॅचचा छत्तीसगड कॅडरचे IAS अधिकारी आहेत. नुकतेच त्यांनी ट्विटरवर त्यांचे आवडते पुस्तक शेअर केले आणि त्याद्वारे त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केल्याचे सांगितले. त्यांनी त्यांची बिहार बोर्ड 10वीची मार्कशीटही ट्विटरवर शेअर केली. ज्यामध्ये त्यांची कमी संख्या पाहिली जाऊ शकते. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांची यशोगाथा सांगते की अपयशातही यश दडलेले असते. अपयशातून मिळालेला अनुभव भविष्यात उपयोगी पडेल. प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल. ध्येयाकडे वाटचाल करत राहा. झोकून देऊन मेहनत करत राहा. अपयशाला घाबरू नका.
https://twitter.com/AwanishSharan/status/1535890479447183360?s=20&t=82I7GFJTzciUHFHvU9QArA
अवनीश यांच्या या कथेला सोशल मिडियात मोठा प्रतिसाद मिळत आहे. एका यूजरने लिहिले की, पडल्यानंतर उठण्यात जी मजा असते ती वेगळीच असते. दुसर्याने लिहिले, “सर, आजकाल 1-2 स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर लोक निराश होतात जणू निराशेचा डोंगर कोसळला आहे आणि त्यांनी तयारी मधेच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तुमची कहाणी, तुमचा संघर्ष प्रेरणादायी आहे. एका यूजरने लिहिले – जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत. आपण सर्वांनी आपल्याकडून काहीतरी शिकले पाहिजे.
अवनीश अनेकदा आपल्या ट्विटद्वारे भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरित करत असतात. सोशल मीडियावर उमेदवार त्यांच्याकडून तयारीच्या टिप्स घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी अवनीश यांनी ट्विटरवर त्याच्या आवडत्या पुस्तकाची झलक शेअर केली होती. ज्यातून त्यांनी UPSC व CSE नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती. अवनीश हे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाले आहेत.
https://twitter.com/AwanishSharan/status/1540724086761877504?s=20&t=82I7GFJTzciUHFHvU9QArA
IAS Officer Awanish Sharan Mind Blowing Success Story