विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना बाधित रुग्ण आणि नातेवाईकांसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि प्लाझ्मा दाता शोधण्याकरिता मोठी चिंता निर्माण होते. परंतु दिल्लीमध्ये मात्र काही प्रमाणात ही चिंता मिटली आहे. कारण येथील एका आयएएस अधिकाऱ्यांने ही अभिनव सेवा सुरू केली असून त्याची देशभरात चर्चा होत आहे.
दिल्लीचे आयएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी http://unitedbyblood.com ही वेबसाइट सुरू केली आहे. तेथे एकाच वेळी या दोन्ही सुविधा मिळू शकतात. यासाठी आपल्याला जास्त काही करण्याची आवश्यकता नाही, फक्त फॉर्मवर आपला तपशील भरावा लागतो. तपशील भरल्याबरोबरच ही वेबसाइट यानंतर आपल्याला आपल्या क्षेत्रातील प्लाझ्मा दात्यांची नावे आणि पत्ते देखील प्रदान करण्यात येतात. याशिवाय तुम्हाला या संकेतस्थळावरुन ऑक्सिजन टॅक्सी सेवेची सुविधासुद्धा मिळेत. या टॅक्सीतून ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात आले आहेत. जर एखादा रुग्ण गंभीर असेल तर त्याला या टॅक्सीद्वारे ऑक्सिजन देखील पुरविला जाऊ शकतो.
अभिषेक सिंह म्हणाले की, कोरोना संक्रमण काळात दिल्लीतील लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे ही वेबसाइट सुरू केली गेली आहे. त्यात खूप माहिती जोडली गेली असून ती लोकांना उपयोगी पडते. अनेक लोक प्लाझ्मा दाता शोधत आहेत, परंतु त्यांना तो सापडत नाहीत. या परिस्थितीत फसवणूक देखील होत आहे. परंतु या वेबसाइटला भेट दिल्यास, ते आपल्या क्षेत्रातील दाता निवडू शकतील.
राजधानी दिल्लीत आता कोरोनाबाबत दिलासा मिळाला आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत ८ हजार ५०० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर संसर्ग दर आता १८ वरून १२ टक्क्याच्या जवळपास खाली आला आहे. अशी माहिती स्वतः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. ते म्हणाले की, कडक बंदोबस्तामुळे कोरोनाची प्रकरणे खाली आली आहेत, परंतु आम्हाला ती टक्केवारी खाली शून्यावर आणावी लागेल. येत्या २ दिवसात दिल्लीला आणि १२०० बेडची सुविधा दिली जाईल, अशीही त्यांनी माहिती दिली आहे.