इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उच्च पदावरील सरकारी नोकरीचे बहुतांश तरुणांना आकर्षण असते. त्यासाठी ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतात. परंतु सर्वाधिक काठिण्यपातळी असलेली स्पर्धा परीक्षा म्हणजे यूपीएससी होय. त्यातही नागरी सेवा म्हणजेच आयएएस साठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत अत्यंत कठीण प्रश्न विचारले जातात. त्याचा सर्वसामान्य विद्यार्थी विचारही करू शकत नाही. दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न असते. अनेक तरुण UPSC द्वारे घेण्यात येणारी पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा उत्तीर्ण करतात, परंतु अनेक वेळा UPSC मुलाखतीत उमेदवारांसमोर असे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे उमेदवार गोंधळून जातात. आयएएस परीक्षेत अनेक वेळा असे विचित्र आणि गुंतागुंतीचे प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते प्रश्न वाचून कोणालाही आश्चर्य वाटू शकते. यातील काही प्रश्नांबद्दल जाणून घ्या आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देता येतील का? याचाही विचार करा, परंतु या परीक्षेत नेमके कोणते प्रश्न विचारले जातात, याची सर्वांनाच उत्सुकता असते. असेच काही आयएएस परीक्षा साठी असेच काही विचारलेल्या प्रश्नांची माहिती करून घेऊ या..
१) कोणत्या प्राण्याला कान किंवा डोळे नाहीत?
उत्तर: गांडुळ.
२) कोणत्या प्राण्याला ३ डोळे आहेत?
उत्तर: तुआतेरा.
३) जगातील कोणत्या देशात शेती नाही?
उत्तरः सिंगापूर
४) अशी कोणती वस्तू आहे, जी कोरडी झाल्यावर 1 किलो, ओली झाल्यावर 2 किलो आणि जळल्यावर 3 किलो होते?
उत्तर: सल्फर
५) साधारणतः 1 वर्षात किती तास आहेत?
उत्तर: 8,760 तास.
६) हत्ती आपल्या सोंडेत किती पाणी धरू शकतो?
उत्तर: 5 लिटर.
७) साधारणतःमहिन्यात किती तास असतात?
उत्तर: 73,001
८) अशी कोणती गोष्ट आहे जी महिन्यातून एकदा येते आणि 24 तास पूर्ण करून निघून जाते?
उत्तर: तारीख.
९) कोणत्या प्राण्याची हाडे सर्वात मजबूत असतात?
उत्तर: वाघ.
१०) पाण्यातही जळते ते काय?
उत्तर: सोडियम आणि पोटॅशियम.