इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विविध कारणांनी सातत्यानं एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली होण्याचा विक्रम काही अधिकाऱ्यांच्या नावावर आहे. यात अशोक खेमका आणि तुकाराम मुंढे यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. या दोघांच्याही नावावर बदलीचे विक्रमही आहेत. तुकाराम मुंढे यांचीही आतापर्यंत २०वेळा बदली झालेली आहे. पण आता तीस वर्षांच्या कालावधीत ५४ वेळा बदली झालेले अशोक खेमका ५५व्या बदलीमुळे चर्चेत आहेत.
अशोक खेमका हरियाणातील प्रशासकीय सेवेत कार्यरत असून अलीकडेच त्यांच्या नव्या बदलीची बातमी पुढे आली आहे. वरीष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (आयएएस) अशोक खेमका यांना आता पुरालेख विभागात रुजू होणार आहेत. खेमका मुळचे कोलकाताचे असून ते १९९१ सालच्या बॅचचे आयएएस आहेत. ते आयआयटी खरगपूर येथून १९८८ साली पदवीधर झाले. पुढे त्यांनी मुंबईतील टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये पीएचडी आणि एमबीए केले.
१९९१ साली ते प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांची बदली होत आहे. तीस वर्षांच्या प्रशासकीय नोकरीत त्यांची ही ५५ वी बदली आहे. अर्थात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, पण तरीही एवढ्या सातत्याने बदली होण्यामागे काय कारण असेल, हे अद्याप प्रशासकीय गुपित समजले जात आहे. मुख्य म्हणजे खेमका देखील कुठलाही बाऊ न करता आपल्या नवीन सेवेत रुजू होतात. त्यामुळे कारण अद्याप उलगडलेले नाही.
शेवटची बदली दोन वर्षांपूर्वी
अशोक खेमका यांची शेवटची बदली ऑक्टोबर २०२१ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात झाली होती. ते पुरातत्व व संग्रहालये या विभागातून आले होते. विज्ञान व तंत्रज्ञान विभागात ते प्रधान सचिव म्हणून रुजू झाले. त्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारीत त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बढतीही मिळाली. अशात पुन्हा एकदा बदली आश्चर्याचे मानले जात आहे. त्यांच्यासोबत सिव्हिल सर्व्हिसमधील चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्याचे सांगण्यात आले आहे.
IAS Ashok Khemka 55th Transfer in 30 Years Career
Haryana Officer