नवी दिल्ली – तिन्ही सुरक्षा दलांचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला तामिळनाडून अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्राणज्योत अखेर मावळली आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रावत आणि त्यांच्या पत्नीसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि काही कर्मचारी यांनी घेऊन भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर चेन्नईहून जात होते. त्याचवेळी कुन्नूर येथे घनदाट जंगलात या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत रावत, त्यांची पत्नी यांच्यासह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात या हेलिकॉप्टरचे चालक ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे अतिशय गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारार्थ सैन्य हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा होत नव्हती.
https://twitter.com/IAF_MCC/status/1471014776377511939?s=20
संपूर्ण देशवासिय त्यांच्यासाठी प्रार्थना करीत होते. अखेर आज त्यांची झुंज अपयशी ठरली. तशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. त्यामुळे या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, वरुण सिंग यांना या वर्षीच शौर्य चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते अतिशय हुशार आणि धाडसी अधिकारी होते.