इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमवीराने एका अनोळखी महिलेला ‘आय लाइक यू’ मेसेज पाठवला. हा मेसेज प्रेमवीराला चांगलाच महागात पडला आहे. आपल्या पत्नीला ‘आय लाइक यू’ संदेश पाठवल्यामुळे मारहाण झाल्याचा दावा करणाऱ्या ट्विटर वापरकर्त्याला पंजाब पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुशांत दत्त असे अनोळखी महिलेला मेसेज पाठवणाऱ्या प्रेमवीराचे नाव आहे.
ट्विटर वापरकर्त्याने सांगितले की, त्याला त्याच्या सुरक्षेची काळजी आहे आणि काही तासांनंतर, त्याने ट्विट हटवले पण त्याचा स्क्रीनशॉट आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. पोलिसांना केलेल्या ट्विटमध्ये युजर सुशांत दत्त हा युवक म्हणाला, ‘सर, मी कुणाला ‘आय लाइक यू’ मेसेज पाठवला, काल रात्री तिचा नवरा आला आणि मला खूप मारलं, मी त्याची वारंवार माफीही मागितली. पण आता मला सुरक्षेची काळजी वाटत आहे. कृपया गरजूंना मदत करा, आणि माझे जीवन सुरक्षित करा, आज आणखी एक हल्ला होऊ शकतो.
पोलीस म्हणाले की, एका महिलेला तुमच्या अवास्तव मेसेजवर तुमची काय अपेक्षा होती ? पण त्यांनी तुम्हाला मारहाण केली असावी. त्यांनी तुमची आम्हाला तक्रार करायला हवी होती आणि आम्ही कायद्याच्या योग्य कलमांनुसार तुमची सेवा केली असती. या दोन्ही गुन्ह्यांची कायद्यानुसार योग्य ती दखल घेतली जाईल! तसेच तुम्हाला कोणीही मारहाण करणार नाही, असे म्हटले आहे. तसेच अज्ञात व्यक्तीला असा मेसेज करू नये. कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
अनेक ट्विटर वापरकर्त्याने पोलिसांचे जोरदार कौतुक केले असून दुसर्या ट्विटमध्ये पोलिसांनी सुशांत दत्तला जवळच्या पीएसला भेटून तक्रार दाखल करण्यास सांगितले. ट्विटर वापरकर्त्यांना पोलिसांचा प्रतिसाद आवडला आणि त्या माणसाची खिल्ली उडवणारे अनेक हसणारे इमोजी पोस्ट केले.
एका यूजरने लिहिले, ‘बेस्ट पोलिस’. त्याचवेळी दुसऱ्या युजरने ‘परफेक्ट’ असे लिहिले. तिसऱ्या ट्विटर वापरकर्त्याने म्हटले, ‘तुम्ही कोणाच्या तरी पत्नीला ‘आय लाइक यू’ संदेश पाठवला आणि तिच्या पतीने प्रतिक्रिया न देण्याची अपेक्षा केली. तुम्ही जे केले ते या प्रकारची कृती चिथावणी देणारे आहे.’ पोलिसांच्या या उत्तराला जवळपास 200 ट्विटर युजर्सनी लाईक केले आहे. पंजाबमधील या प्रेमवीराचा ‘ संदेश’ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
I Like You Message to Women Husband beaten a Man Crime