मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – गेल्या दोन वर्षात कोरोनाचा संसर्गामुळे वाहन उद्योगावर मोठे संकट कोसळले होते. परंतु आता पुन्हा एकदा वाहन उद्योग उभारी घेत असून अनेक वाहन कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या कारचे मॉडेल बाजारात आणत आहेत. Hyundai India आपल्या ग्राहकांसाठी या महिन्यात मध्ये मोहीम राबवत आहे. आपण नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे, जिथे Hyundai India त्यांच्या अनेक वाहनांवर 50 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफर अंतर्गत Hyundai च्या SUV मध्ये Creta, Hyundai Alcazar, Hyundai Tucson, Hyundai Verna, Hyundai Grand i10 Nios, Hyundai Centro, Hyundai i20 इत्यादी मॉडेल्सचा समावेश आहे. फेब्रुवारीची मोहीम ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंतच उपलब्ध आहे.
ह्युंदाई Grand i10 Nios :
या कारची किंमत – 5.28 लाख रुपयांपासून असून Hyundai Grand i10 Nios भारतीय बाजारपेठेत पेट्रोल, डिझेल आणि CNG इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाते, म्हणूनच हे वाहन लोकप्रियतेत कायम आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी या वाहनावर 48,000 पर्यंत सूट देत आहे. सध्या Hyundai ग्राहकांना कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट इत्यादी मिळतील. या कारचे इंजिन 1.2-लीटर आणि 1.0-लीटर टर्बो GDi इंजिन पर्याय त्याच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये दिले गेले आहेत, तर डिझेलमध्ये 1.2-लीटर CRDi इंजिन दिले गेले आहे.
ह्युंदाई सँट्रो
या कारची किंमत- 4.86 लाखपासून सुरू होईल. ह्युंदाई सॅन्ट्रो खरेदी करणाऱ्यांना 40 हजारांहून अधिक कंपनी सवलत देत आहे, या सवलतीमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. या कारचे इंजिन, Hyundai ला 1.1-लीटर Epsilon mpi पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, त्याचे CNG प्रकार देखील उपलब्ध आहे. मात्र ऑफर फक्त पेट्रोल प्रकारावर उपलब्ध आहे.
ह्युंदाई i20
या कारची किंमत- 6.98 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Hyundai i20 खरेदी करणाऱ्यांना कंपनी 40 हजारांपर्यंत सूट देईल. मात्र, ही ऑफर फक्त डिझेल व्हेरिएंटवर उपलब्ध आहे, जी 28 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध आहे. तसेच Hyundai i20 चे पेट्रोल 1.2-लीटर आणि 1.0-लीटर टर्बो इंजिन पर्यायात दोन प्रकारात उपलब्ध आहे, तर डिझेल 1.5-लिटर इंजिनद्वारे समर्थित आहे.