इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या अनेक ठिकाणी भीषण अपघात घडत आहेत. धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे भरधाव कंटनरने ९ वाहनांना उडवत थेट हॉटेलमध्ये प्रवेश केला. या अपघातात १० जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. त्यातच आता हैदराबाद येथील घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन महिलांना भरधाव कारने चिरडले. या घटनेमध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.
नेमकं काय घडलं
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हैदराबादमधील हैदरशाकोट मेन रोडवर सकाळच्या वेळी अनेक स्त्री पुरुष मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडून रस्त्याने पुढे चालत फिरायला जातात. त्याचवेळी या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जात असतात. सकाळी ६ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी दोन महिला आणि एक मुलगी अशा तिघीजणी गेल्या होत्या. रस्त्याच्या कडेवरून जात असताना अचानक एक भरधाव कार आली आणि तिने या तिघींना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघीही अक्षरश: कारसोबत रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. विशेष म्हणजे हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या मुलीवर रुणालयात उपचार सुरु आहे. तिची प्रकृती गंभीर आहे.
व्हिडिओ तुफान व्हायरल
अपघाताची घटना घडतात रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी तेथे धाव घेतली त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. घटनेची माहिती कळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या संदर्भात चौकशी करून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु यात मृत पावलेल्या दोघी आणि जखमी झालेली एक महिला नेमक्या कुठून आल्या कुठे राहतात, याची अद्याप माहिती कळालेली नाही, तसेच त्या तिघी एकत्र सोबत आले होते का हेही समजलेले नाही. मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वळणाच्या रस्त्यालगत कडेला तिन्ही महिला चालत असताना या महिलांच्या पाठीमागून लाल रंगाची कार आली, चालकाने महिलांना पाहून चालकाने ब्रेक दाबला. मात्र कारचा वेग इतका जास्त होता की, चालकाला त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. ही कार थेट तिन्ही महिलांना धडक देतो. कारसोबत या तिन्ही महिला थेट झाडाझुडपात जाऊन पडल्या. सोसायटीच्या गेटवर लावलेल्या कॅमेऱ्यात ही घटना स्पष्ट दिसून येत आहे.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/NikhilCh_/status/1676184691907637249?s=20