इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत लग्न केले, याला आणखी एक कारण म्हणजे त्याने दारूच्या नशेतच तिला तलाक दिला होता. इतकेच नव्हे तर त्या महिलेने आता धर्मही बदलला असून रुबीना ऐवजी पुष्प हे नाव धारण केले आहे. विशेष म्हणजे तिला पहिल्या पतीपासून तीन मुले आहेत, पण नाईलाजाने तिला दुसरा घरोबा करावा लागला, असे दिसून येते.
खूप वर्षांपूर्वी एका हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता राजेश खन्ना यांच्या तोंडी एक डायलॉग तथा संवाद फार प्रसिद्ध झाला होता, तो म्हणजे, ‘ अरे वा पुष्पा आय हेट टिअर्स ‘ या संवादाची आठवण येण्याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात एका महिलेला तिच्या पती सारखा मारहाण करीत असेल त्यामुळे तिला अश्रू अनावर होत झाले होते.
दारू पिऊन बायकोला मारहाण करणे हा जणू काही आपला हक्कच आहे, असे काही नवऱ्यांना यांना वाटते, परंतु बिचारी पत्नी हा जाच मोकाट्याने सहन करीत संसार आणि मुलाबाळांचा सांभाळ करते, परंतु काही वेळा महिलांना हा त्रास नकोसा होतो, तेव्हा त्या नैराशातून कंटाळून आत्महत्या करतात किंवा नाईलाजाने नवऱ्याला सोडून जातात. बरेली येथे एका महिलेने आपल्या दारुड्या नवऱ्याच्या सततच्या मारहाणीला कंटाळून दहा वर्षाचा संसार मोडला, इतकेच नव्हे तर आपल्या हिंदू प्रियकराशी मंदिरात जाऊन लग्न करीत दुसरा संसार देखील थाटला, त्याचप्रमाणे तिने धर्मांतर देखील केले असून रुबेना ऐवजी आता ती पुष्पा बनली आहे.
खरे तर, रुबीना दहा वर्षापूर्वी पती शोएबसोबत सुखी संसाराची स्वप्ने पाहत होती. परंतू तिला पती रोज दारुच्या नशेत मारहाण करायचा. तिला शोएबपासून तीन मुले झाली आहेत. पण हा जाच वाढतच गेला. याच काळात तिची ओळख प्रेमपाल या हिंदू तरुणाशी झाली होती. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या पतीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे शोएब आपल्या नव्या पतीला कधीही मारून टाकू शकतो, अशी भीती तिला वाटत आहे. यामुळे तिने पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर प्रेमपाल म्हणाला की, आम्ही लग्न केले कारण शोएब रुबीनाला खूप त्रास द्यायचा. रुबिनाने तलाकचे सांगितल्यावर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला असून त्याला माझ्या परिवाराची परवानगी आहे, असेही त्याने सांगितले.
Husband Wife Religious Transformation Wedding