रामपूर – उत्तर प्रदेशात एक अत्यंत दुर्देवी आणि भयानक घटना घडली. एका शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत असताना त्याची पत्नी मात्र स्वतः दारावर पहारा देत होती. या अमानुष घटनेबद्दल अत्यंत संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंज कोतवाली परिसरातील होळीच्या दिवशी १४ वर्षाची किशोरवयीन मुलगी शेजारच्या घरी गेली होती. शेजारच्या माणसाने आणि त्याच्या पत्नीने त्या मुलीला एका खोलीत बंद केले. त्या माणसाने त्या मुलीवर बलात्कार केला. तेव्हा त्याची बायको घराबाहेर पाहरा देत होती.
मात्र दोन दिवसांनंतर, तिने रडत आपल्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीची आई पोलिस स्टेशनमध्ये आली. तिने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. संशयित आरोपी पती आणि पत्नीविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व त्याच्या पत्नीच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप आरोपींना अटक केलेली नाही.