नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजचा जमाना हा समाजात वावरण्याचा नव्हे तर समाज माध्यमांचा म्हणजे सोशल मीडियाचा आहे असे म्हटले जाते. सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की, त्याचा जणू काही छंद नव्हे तर आजारात जडला की काय असे वाटू लागले आहे. याबाबत पोलीस प्रशासन इतकेच नव्हे तर मानसशास्त्रज्ञ आणि मनोविकार तज्ज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर कोण कुणीही कसलेही फोटो टाकतो, व्हिडिओ अपलोड केले जातात. एखादी चांगली घटना असेल तर ठीक परंतु वाईट घटनांचे देखील फोटो टाकले जातात आणि व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यामुळे एक प्रकारे त्या व्यक्तीची विकृत मनोवृत्ती दिसून येते. अगदी आपल्या स्वतःच्या घरातील व्यक्तींचे देखील वेगवेगळ्या अवस्थेतील व्हिडिओ शेअर करणे ही एक विकृतीच म्हणावी लागेल. एका पती महाशयाने चक्क आपल्या पत्नीच्या आंघोळीचा व्हिडिओच फेसबुकवर शेअर केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
नातेवाईकांमध्ये ही घटना समजतात त्यांनी समजताच त्यांनी संताप व्यक्त केला असून पत्नीने आता पतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असा प्रकार समाजात घडणे हे निश्चितच वाईट गोष्ट म्हटली जात आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काही व्यक्ती काहीही करू शकतात. फॉलोवर्स वाढवणं जणू काही मोठा छंद तथा गौरव वाटत आहे. त्यात अनेक किस्सेसमोर आले आहेत. यात एका व्यक्तिने फेसबुकचे फॉलोअर्स वाढविण्यासाठी सर्व हद्द पार केली असून लाज सोडली आहे. याने आपल्याच बायकोचा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. कारण साधासुधा व्हिडीओ नव्हता. त्याने शेअर केलेला व्हिडीओ हा त्याच्या बायकोचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ शेअर होताच प्रचंड गदारोळ झाला. पत्नीने आपल्या पती विरोधात पोलीसांत तक्रार केली.
फेसबुकवर व्हिडीओ शेअर केलेला तो संदीप नावाचा व्यक्ती हा दिल्लीच्या उत्तम नगरमधील झोपडपट्टीत राहतो आणि तेथेच एका सर्कसमध्ये काम करतो. काही दिवसांपूर्वी संदीपची बायको माहेरी, कासगंजला होती. संदीप तिच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलत होता. व्हिडीओ कॉल चालू असतानाच संदीपची पत्नी अंघोळीला जाते. मात्र आपला फोन ती बाथरूममध्ये ठेवते आणि आपल्या पतीशी बोलू लागते. याच दरम्यान संदीप आपल्या पत्नीचा हा व्हिडिओ बनवून फेसबुकवर शेअर करतो. जसा हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर झाला तसा तो व्हायरल झाला. संदीपच्या पत्नीला नातेवाईकांचे फोन येऊ लागले. हा व्हिडिओ त्याच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांनी पाहिला होता.
या व्हिडिओवर अनेक अश्लील कमेंट्सही येऊ लागल्या. तेव्हा संदीपच्या पत्नीने फेसबुक अकाउंट पाहिले. तिला फेसबुकवर आंघोळ करतानाचा व्हिडिओ दिसला. तिने पतीला फेसबुकवरून व्हिडिओ हटविण्यास सांगितले, मात्र पतीने त्याला नकार . संदीपच्या पत्नीने पतीविरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला तेव्हा त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ डिलीट केला. पोलीस आता या व्यक्तीची कसून चौकशी करीत आहेत.
Husband Post Wife Video on Facebook
Cyber Crime Social Media Police FIR Booked