इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीमध्ये प्रेम आणि जिव्हाळ्याचे संबंध असतात. परंतु काही वेळा वादविवाद आणि भांडण देखील होते. परंतु हे भांडण लगेच मिळते, मात्र भांडण आणि वाद वाढत गेले. तर त्यातून रागाच्या भरात काही दुर्दैवी किंवा वाईट घटना देखील करू शकतात,अशाच प्रकारची एक घटना नुकतीच घडली असून किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने रागाच्या भरात पत्नीने हत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पती-पत्नीमध्ये अनेकदा छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होत असतात. काही वाद हे टोकाला देखील जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. जीन्समुळे धक्कादायक घटना घडली. आता तुझे लग्न झाले आहे, जीन्स घालू नको, असे म्हणत पतीने रोखताच पत्नी संतापली आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात पतीची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
झारखंड जिल्ह्यातील जमताडा परिसरात ही भयंकर घटना घडली. पुष्पा हेंब्रम या तरुणीचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नाला अवघे दोन महिने पूर्ण झाल्यावर पतीने जीन्स घालण्यावरून रोखलं. पुष्पा जीन्स घालून गोपालपूर गावात जत्रेसाठी गेली होती. ती जेव्हा परत आली तेव्हा पतीने आता तुझं लग्न झालं आहे. त्यामुळे जीन्स घालून जत्रेला जाऊ नको असं सांगितलं.
दरम्यान, पतीचं असं बोलणं ऐकताच पुष्पा संतापली आणि तिने पतीवर चाकून जोरदार वार केला. यामध्ये पती गंभीररित्या जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले पण त्याचा मृत्यू झाला. पुष्पाने देखील आपला गुन्हा कबुल केला आहे. सासरच्या मंडळींनी याबाबत पोलिसांत धाव घेतली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Husband Murder Wife Wearing Jeans Crime