मुंबई – पाश्चिमात्य देशांमधील लोक काय करतील याचा नेम नसतो. कधी त्यांचे लैंगिक स्वातंत्र्य मूर्खपणाचा कळस वाटतो, तर कधी त्याच स्वातंत्र्यातून काहीतरी अफलातून घटना पुढे येतात. अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एका पतीने आपल्या पत्नीला स्पर्म डोनेट केले. त्याचे तीन लग्न झाले असून पहिली पत्नी समलैंगिक असल्याने तिला घटस्फोट दिला होता. पण आता याच पत्नीला त्याने आता स्पर्म डोनेट केले आहेत.
पहिली पत्नी सध्या तिच्या गर्लफ्रेंडसोबत राहते. या माणसाचे तीन लग्न झाले असून त्याने नाव जोश रप्पन असे आहे. तो आपल्या खासगी आयुष्यात पूर्णपणे समाधानी आहे आणि त्याच्या तिन्ही बायकाही खुश आहेत. जोशचे पहिले लग्न झाले तेव्हा त्याला माहिती नव्हते की त्याची पत्नी समलैंगिक आहे. लग्नानंतर त्याला जेनिफर समलैंगिक असल्याचे माहिती झाले आणि दोघांनीही सामंजस्यातून घटस्फोट घेतला आणि दुसरे लग्न केले. एवढ्यावर जोश थंड झाला नाही. त्याने तिसऱ्या लग्नाची तयारी केली आणि यावेळी पहिल्या पत्नीची मैत्रीणच त्याची बायको झाली. पण पहिली पत्नी जेनिफर हिला अपत्य ठेवायचे होते. ती समलैंगिक असल्याने तिला शक्य झाले नाही, त्यामुळे जोशने तिला स्पर्म डोनेट केले आणि आता तिला एक बाळसुद्धा आहे. जोशला दुसऱ्या पत्नीपासून एक 5 वर्षाची मुलगी आहे. हे सारे लोक एकत्र राहतात आणि एका संयुक्त कुटुंबासारखे राहतात, हे विशेष. हे सगळे एका टीव्ही शोमध्ये एकत्र सामील झाले होते. त्यातूनच साऱ्या जगाला यांची माहिती मिळाली.