इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ड्रामा क्वीन राखी सावंत हिचा ‘बिग बॉस मराठी सीजन ४’ मध्ये चांगलाच बोलबाला होता. तिथून बाहेर पडल्यावर तिने आदिल खान याच्याबरोबर लग्न केल्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतर राखीवर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या सर्वात जवळची व्यक्ती असलेली तिच्या आईचे निधन झाले. या दुःखातून सावरत नाही तोच तिने पती आदिलवर दुसऱ्या प्रेमसंबंधाचे आरोप केले आहेत. राखीच्या या सगळ्या आरोपांवर आता आदिलने मौन सोडले आहे. इतके दिवस गप्प असलेल्या अदिलने आता याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आदिल कामानिमित्त बाहेर गेला असता पापाराझी छायाचित्रकारांनी त्याला घेरलं. यावेळी आदिलला राखीने केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. तेव्हा फारसं स्पष्टीकरण न देता त्याने एका वाक्यात उत्तर दिलं. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये आदिल म्हणतो की, “राखीने घरातील भांडणं घरातच ठेवली पाहिजे.” यापुढे या वादावर काहीही बोलणं आदिलने टाळलं. मात्र, राखी अजूनही आदिलबाबत प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिसत आहे. आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर आहे, असे सांगतानाच आदिल आणि त्या मुलीचे व्हिडीओ तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकीही राखीने दिली.
https://twitter.com/viralbhayani77/status/1621107885215453185?s=20&t=RZw1sf6GfBGhk475Fev_-Q
राखी म्हणाली, “आता माझी आईच नाही. त्यामुळे यापुढे कोणतीही गोष्ट गमवल्याचं मला दुःख होणार नाही. मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये दीड महिना होते. तेव्हा त्याचा तू गैरफायदा घेतला आहेस. आता मी त्या मुलीचं नाव सांगत नाही. पण वेळ आल्यावर मी त्या मुलीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करणार.” आता राखी आणि आदिलचा हा वाद किती विकोपाला जाणार, हे येणार काळच सांगणार आहे.
https://twitter.com/viralbhayani77/status/1621108656367620097?s=20&t=RZw1sf6GfBGhk475Fev_-Q
Husband Adil Sawant on Actress Rakhi Sawant Allegation