नवी दिल्ली – फ्रान्सची मुख्य वाहन निर्माता कंपनी Renault ने याच महिन्यात आपल्या सर्व वाहनांवर बंपर डिस्काउंट ऑफर दिली आहे. या वाहनांच्या खरेदीवर तुम्ही ९० हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. कंपनीच्या या स्किममध्ये कॉर्पोरेट डिस्काउंटपासून रोख रकमेची सवलत, एक्सचेंज बोनस आणि अतिरिक्त सवलतीचा समावेश आहे. त्याशिवाय ग्राहक वाहनांवर स्क्रॅपिंग पॉलिसीचा लाभ घेऊ शकणार आहेत.
रेनॉल्ट इंडियाने निवडक मॉडेलसाठी “बाय नाउ, पे इन २०२२” योजना सादर केली आहे. यामध्ये सहा महिन्यांपर्यंत ईएमआयमध्ये सवलत दिली जात आहे. ही ऑफर ३१ ऑगस्ट पर्यंत खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांसाठी लागू होणार आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट २०२१ पासून रेनॉल्टन आपल्या R.E.Li.V.E. स्क्रॅपेज कार्यक्रमांतर्गत दहा हजार रुपयांपर्यंत विशेष लाभ देणार आहे. रेनॉल्टने या कार्यक्रमासाठी CERO रिसायक्लिंग सोबत भागिदारी केली आहे. ग्राहक आपल्या दुचाकी किंवा चारचाकींना स्क्रॅप करू शकतात. ग्राहक एक योग्य स्क्रॅप मूल्यांकनासह नवी रेनॉल्ट क्विड, ट्रायबर किंवा डस्टर खरेदी करू शकतात.
Renault Kwid
महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केरळमध्ये Renault Kwid ला ५० हजारांपर्यंतच्या सवलतीत सादर केले आहे. भारताच्या इतर भागात ग्राहक या वाहनांवर ४० हजारपर्यंतचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरमध्ये प्रत्येकी वीस आणि दहा हजार रुपयांची रोख सवलत, वीस हजारांपर्यंतच्या एक्सचेंज फायदा आणि दहा हजारांपर्यंत लॉयल्टी बोनसचा समावेश आहे. पात्र ग्राहकांना दहा हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कॉर्पोरेट सवलतीचा लाभ दिला जात आहे.
Triber
या महिन्यात Renault ने आपल्या प्रसिद्ध ७ सिटर कार Triber वर आकर्षक सवलत दिली आहे. या खरेदीवर तुम्ही ७० हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. त्यामध्ये २५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, दहा हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि निवडक व्हेरिएंट्सवर ३५ हजार रुपयांचा रोख रकमेचा फायदा मिळणार आहे. ही ऑफर फक्त महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि गोवासारख्या राज्यांमध्ये दिली जात आहे. इतर राज्यांमध्ये साठ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.