इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणतीही इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक बाजारात जातो, तेव्हा त्या वस्तूची गॅरंटी किंवा वॉरंटी देण्यात येते. परंतु सदर वस्तू नादुरुस्त झाली किंवा खराब निघाली तर ती परत घेण्यास दुकानदार किंवा विक्रेते टाळाटाळ करतात. तसेच कंपनीकडूनच वस्तू खराब आल्याचे सांगतात. परंतु जर एखादी अत्याधुनिक वाहन नादुरूस्त निघाले तर काय होईल. याचा आपण विचारही देखील करू शकत नाही. परंतु ह्युंदाईच्या काही वाहनांमध्ये समस्या निर्माण झाल्याने या कंपनीने हजारो गाड्या परत मागवल्या आहेत,
विशेष म्हणजे मागील वर्षी महिंद्रा अँड महिंद्रा या देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीने मात्र विक्रीस गेलेल्या त्यांच्या वाहनांमध्ये मोठा दोष आढळल्याने ऑगस्ट २०२१ मध्ये सुमारे ३० हजार वाहने परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी जुलै २०२१ ही असाच काही वाहनांमध्ये दोष आढळल्याने सुमारे ६०० वाहने परत मागविण्यात आली होती.
आता ह्युंदाई मोटार कंपनीने देखील २६ हजारांहून अधिक वाहने त्यांच्या सदोष कार्यामुळे परत मागवली आहेत. विंडशील्डच्या समस्येमुळे कंपनीने ही वाहने परत मागवली आहेत. कंपनीने यूएसमधील सन २०२० आणि २०२१ ची एलांट्रा, सांता फे आणि सोनाटा सेडान मॉडेल्सच्या हजारो युनिट्ससाठी हे रिकॉल केले आहे.
नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने जारी केलेल्या रिकॉल रिपोर्टनुसार, या वाहनांच्या पुढील विंडशील्ड्स कदाचित व्यवस्थित बसवण्यात आल्या नसतील. त्यामुळे, अपघात झाल्यास ते सैल होऊ शकते. ज्या वाहनांमध्ये समस्या नोंदवली गेली आहे अशा वाहनांच्या चालकांना वाऱ्याचा आवाज येईल किंवा वाहनाच्या विंडशील्डमधून पाणी गळत असल्याचे दिसून येऊ शकते, म्हणजे विंडशील्ड ढिले झाल्याचे लक्षण असू शकते.
विंडशील्डच्या समस्येमुळे कंपनीला अद्याप कोणतीही दुर्घटना किंवा दुखापत झाल्याची माहिती नाही. ह्युंदाई मोटार कंपनी दि. २५ फेब्रुवारीपासून बाधित वाहनांच्या मालकांना माहिती देण्यास सुरुवात करेल. त्यानंतर कंपनीचे डीलर वाहनाचे आधीचे विंडशील्ड काढून टाकतील आणि तेथे पुन्हा नवीन स्थापित करतील. यासाठी वाहन मालकांना कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही ही प्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे, त्यांचे वाहन रिकॉलचा भाग आहे की नाही हे पाहण्यासाठी ग्राहक NHTSA रिकॉल वेबसाइट देखील तपासू शकतात.
मर्सिडीजने २०२१ या वर्षभरात उत्पादित केलेल्या काही मॉडेल्ससाठी यूएसमध्ये सेफ्टी रिकॉल देखील आयोजित केले होते. तसेच देशातील आघाडीचे वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा यांनी मागील वर्षी काही वाहनांचे रिकॉल (रिकॉल) जाहीर केले. त्यानुसार कंपनीने संभाव्य त्रुटींमुळे शेकडो डिझेल मॉडेल्सच्या गाडया परत बोलवल्या आणि आपल्या काही वाहनांमध्ये डिझेल इंजिनची तपासणी व बदली करण्यासाठी पुन्हा रिकॉलची घोषणा केली होती.