मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्योत्सवांतर्गत घरोघरीच्या बाप्पांचे व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करणे, प्रसिद्ध मंडळे व मंदिरातील गणपतींचे थेट दर्शन मिळावे याकरिता पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.
या पोर्टलवर आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पांचे व सार्वजनिक मंडळातील बाप्पांचे छायाचित्र अपलोड करू शकता. तसेच, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे व सार्वजनिक मंडळातील बाप्पांचे थेट दर्शन घेण्याची सोय देखील या पोर्टलद्वारे करण्यात आली आहे. या संधीचा लाभ अधिकाधिक गणेशभक्तांनी घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.