शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनांना एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी ही एजन्सी…या संकेतस्थळावर करा नोंदणी

by India Darpan
मार्च 12, 2025 | 3:45 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 35

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे आवश्यक आहे. त्यानुसार परिवहन विभागाच्या 23 डिसेंबर 2024 रोजी परिपत्रकानुसार जिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांच्या धारकांनी त्वरीत आपल्या वाहनाची एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वाहनांना एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी M/s. FTA HSRO solutions pvt. Ltd ही एजन्सी व http://maharashtrahsrp.com हे संकेतस्थळ निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करून सोयीप्रमाणे वेळ घेवून नंबर प्लेट बसवून घ्यावी. यासाठी वाहनधारकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंद कार्यालयाच्या अभिलेखावर असणे गरजेचे आहे. एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी जीएसटी वगळता दुचाकी/ ट्रॅक्टर धारकांना रूपये 450, तीन चाकी वाहनांना रूपये 500 व इतर सर्व वाहनांना रूपये 745 इतके शुल्क निश्चित केले आहे.

ज्याठिकाणी 25 किंवा 25 पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्र येवून उदा. कार्यालये, गृहनिर्माण संस्था इत्यादी ठिकाणी मागणी केल्यास संबंधित फिटमेंट शासनाने निर्धारीत केलेल्या शुल्का व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्याची सुविधा अशा ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

वाहनवार एच.एस.आर.पी. नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे/ उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्यावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे. काही अडचण अथवा तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे तक्रार दाखल करावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंचवटी एक्सप्रेसच्या चेअर कार मधील पास धारकांच्या दादागिरीमुळे रेल्वेला दरमहा पाच लाखाचा भुर्दंड…

Next Post

पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी दोघांना घातला तब्बल १९ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

Next Post
crime11

पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी दोघांना घातला तब्बल १९ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011