मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा निकाल ९४.२२ टक्के एवढा लागला आहे. राज्यात कोकण विभाग सर्वप्रथम असून सर्वात शेवटी मुंबई विभाग आहे. यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९५.२४ टक्के लागला आहे. राज्यातील पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५३.२ टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.
येथे पाहता येईल निकाल
http://www.mahresult.nic.in
http://www.hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in
निकालात वाढ
गेल्यावर्षी म्हणजेच २०२१मध्ये बारावीची परीक्षा झाली नव्हती. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. तर, २०२०मध्ये राज्याचा निकाल ९०.६६ टक्के एवढा लागला होता. म्हणजेच २०२०च्या तुलनेत राज्याचा निकाल ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे.
विभागनिहाय निकाल असा
कोकण – ९७.२२ टक्के
पुणे – ९३.६१ टक्के
कोल्हापूर – ९५.०७ टक्के
अमरावती – ९६.३४ टक्के
नागपूर – ९६.५२ टक्के
लातूर – ९५.२५ टक्के
मुंबई – ९०.९१ टक्के
नाशिक – ९५.०३ टक्के
औरंगाबाद – ९४.९७ टक्के
मुलींची बाजी
यंदा ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९३.२९ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. परिणामी, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी २.०६ टक्के अधिक आहे.
विषयनिहाय निकालाची टक्केवारी अशी
विज्ञान- ९८.३० टक्के
कला – ९०.५१ टक्के
वाणिज्य- ९१.७१ टक्के
व्यवसायिक अभ्यासक्रम- ९२.४० टक्के