पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये झालेल्या चुकीनंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून पेपरमध्ये चूक झाल्याने आता विद्यार्थ्यांना ६ गुण दिले जाणार आहेत. बोर्डाकडून २१ फेब्रुवारी रोजी इंग्रजीचा पहिला पेपर घेण्यात आला. या पेपरमध्ये कविता विभागातील (Poetry Section) प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. एकूण ३ चुका झाल्याचे निदर्शनास आले. या तीन प्रश्नांना प्रत्येकी २ गुण होते. म्हणजेच एकूण ६ गुणांची चूक होती. या चुका मान्य करत बोर्डाने आता विद्यार्थ्यांना ६ गुण देण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वांना गुण मिळणार की
झालेल्या चुकीबद्दल सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ६ गुण मिळणार नाहीत. तर, ज्या विद्यार्थ्यांनी हे ३ प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनाच हे गुण दिले जाणार आहेत. पेपरमधील चुकीसंदर्भात बोर्डाने अहवाल मागविला होता. त्यानंतर आता बोर्डाने गुण देण्याचा निर्णय घेतला आहे.
HSC Exam English Paper Mistakes Board Big Decision