पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहावी बारावीच्या परीक्षेत कॉपी सारखे गैरप्रकार होणे ही नवीन गोष्ट राहिली नाही, असे गैरप्रकार सर्रास मध्ये घडतात. परंतु मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी पेपर लिहिल्यानंतर जेव्हा तपासणीसाठी शिक्षकांकडे गेले तेव्हा विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षरे लिहिलेली दिसून आली. विशेष म्हणजे असे एक दोन नव्हे तर ३०० विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडल्याने मोठे खळबळ उडाली आहे. या संदर्भात संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी देखील आपण असा प्रकार केला नसल्याचे सांगत याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
आता या संदर्भात केंद्रप्रमुखांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. मात्र या विद्यार्थ्यांच्या निकालावर त्याचा परिणाम होणार असल्याने सर्वत्र शिक्षण क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, १२वीच्या भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
शिक्षण मंडळाने संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली असून, त्यांना नोटीसा पाठवण्यात येत आहे. मात्र उत्तरपत्रिकामध्ये असलेले दुसरे हस्ताक्षर आमचे नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हे हस्ताक्षर कोणाचे ?असा प्रश्न शिक्षण मंडळाला पडला असून एकाच पेपरला एवढ्या विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये बदल कसा झाला असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचे निकालावरच यामुळे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. तर या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली जाईल, विद्यार्थ्यांनी लिहिलं नाही तर नक्की कोणी लिहिले या प्रकरणाचा शोध घेण्यात येईल असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणावर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे म्हटले आहे की, बारावी परीक्षेत फक्त्त भौतिकशास्त्र विषयातच हा गंभीर प्रकार घडल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. तसेच संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येईल. त्यामुळे चौकशी सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता असून, निकाल थोडा उशिरा लागण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येते.
HSC Exam Answer sheet Student Handwriting Result