नाशिक – लॅमरोडवरील श्री दत्त पेट्रोलियम येथे अनोखे व वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबविण्यात येतात. यात वाढदिवस, सर्व प्रकारचे सर्व धर्माचे सण तसेच जनजागृती विषयक माहिती देण्यात येते, या सर्वांची माहिती ग्राहकांना व्हावी यासाठी पंपाच्या आवारातील स्पिकर व प्रोजेक्टर व्दारे देण्यात येते. सायंकाळी सुध्दा पंपावर प्रोजेक्टर लावण्यात येतो. त्यावर टीव्हीवरील बातम्या, आयपीएल, डिस्कवरी चॅनल व कंपनीच्या जाहिराती देखील दाखवण्यात येतात. त्यामुळे या अनोख्या उपक्रमाला ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. हे सर्व कार्यक्रम कोणताही राजकिय हेतू न ठेवता केले जाते. त्याचप्रमाणे ते सर्वधर्मीयांसाठी असते. त्यामुळे ग्राहकांना यातून चांगली माहिती मिळत राहते. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले आहे.