ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
- बुधवारी नवीन व्यापार सुरू केल्यास संपत्तीत वाढ होते
- बुधवारी कोणालाही उधार किंवा कर्ज देऊ नये
- तृतीय पंथी लोकांकडून आशीर्वाद म्हणून नाणे मिळाल्यास ते तिजोरीत ठेवावे
- शुक्ल पक्षातील गुरुवारी हळद कुंड विकत घेऊन ते आपल्या व्यवसायाच्या तिजोरीत अथवा गल्ल्यात ठेवावे
- बुधवारच्या दिवशी गाईला शिजवलेली मूग डाळ पिठीसाखर कालवून दिल्यास कर्जफेड लवकर करणे शक्य होते
- घरामध्ये श्रीयंत्र स्थापन केल्यास आर्थिक सुबत्ता लाभते
- संध्याकाळी घरी आल्यावर उगाचच चिडचिड करू नये मन शांत व प्रसन्न ठेवावे
- कवडी हे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे म्हणून घरांमध्ये अकरा कवड्यांची पूजा करावी व या कवड्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून घराच्या तिजोरीत ठेवूया किंवा ११ कवड्या लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवून ठेवाव्या त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही