विशेष प्रतिनिधी, पुणे
आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी म्हणून LIC ची ओळख असून लोकांचा LIC वर विश्वास आहे. मात्र या कंपनीने आपल्या पॉलिसीधारक ग्राहकांना एक धोक्याच्या इशारा दिला आहे. पॉलिसीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याचे एलआयसीने स्पष्ट केले आहे.
एलआयसीने आपल्या ग्राहकांना या प्रकारच्या फसवणुकीबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, काही लोक एलआयसीचे कर्मचारी बनून ही फसवणूक करीत आहेत. अनेक लोकांना या प्रकारचा फटका बसला आहे. एलआयसीची पॉलिसी असलेल्या ग्राहकांनी हा इशारा काळजीपूर्वक लक्षात ठेवला पाहिजे. काही फसवे लोक एलआयसीचे कर्मचारी किंवा एजंट बनून आधी लोकांचा विश्वास जिंकतात, मग त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवतात आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढतात, यासाठी त्यांची पूर्ण टीम कार्य करते.
तसेच फसवणूक करणारे LIC पॉलिसीधारकांचा डेटा गोळा करतात आणि त्यांना कॉल करतात. फोन कॉलदरम्यान ते स्वत: ला एलआयसीचा कर्मचारी किंवा सरकारी विभागातील विमा नियामक अधिकारी म्हणून मानतात. मग अशा प्रकारे ते ग्राहकांचा विश्वास जिंकतात. त्यांचा ग्राहकांना विश्वास वाटतो, त्यावेळी हे तोतया लोक त्यांच्याकडे त्यांचे बँक तपशील विचारतात.
ज्या ग्राहकाने वैयक्तिक माहिती शेअर केली, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याचे पैसे बँक खात्यातून गायब होऊ शकतात. कोणालाही असा फोन आला तर सावधगिरी बाळगा. अशा फसवणुकीची प्रकरणे सतत वाढत आहेत. त्यामुळे हे थांबविण्यासाठी एलआयसीने अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, आपल्यालाही असा कॉल आला तर आपण त्याबद्दल तक्रार करू शकता. आपल्या पॉलिसीची कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील जाणून घ्यायचे असल्यास आपण एलआयसीच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता. spuriouscalls@licindia.com वर कळवू शकता. या व्यतिरिक्त आपण co_crm_fb@licindia ईमेल करून तक्रार दाखल करू शकता. त्याच वेळी एलआयसीच्या वेबसाईटला भेट देऊन आपण आपली तक्रार तिथे देवू शकता, असेही LIC ने म्हटले आहे.