पुणे – जीमेल (Gmail) हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा वापर शाळा, महाविद्यालयांपासून ते कार्यालयांपर्यंत केला जातो. कारण या प्लॅटफॉर्मवरून ईमेल पाठविणे सहज शक्य आहे. तसेच ईमेल स्टोअरेजची यामध्ये सुविधा मिळत आहे. युजर्स याद्वारे चॅटिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही करू शकतात. खासगी डाटा असल्यामुळे गूगल अकाउंटला सुरक्षित ठेवणे खूपच आवश्यक आहे. बहुतांश लोक गूगल अकाउंट हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी भक्कम पासवर्ड देतात. पण तरीही अकाउंट हॅक केले जाते. गूगल अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी एक विशेष पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊयात.
असे करावे अॅक्टिव्ह
गूगल अकाउंटला सुरक्षित ठेवण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन पेजवर जावे. तिथे तुम्हाला उजव्या बाजूला Get Started चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करावा. आता तुम्हाला खाली ट्राय इट नाऊ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे. गूगलकडून तुम्हाला एक मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये दिलेल्या No/Yes पैकी Yes या पर्यायावर क्लिक करावे. आता तुमचा मोबाईल नंबर एंटर करावा. त्यानंतर टेक्स्ट किंवा फोन कॉलपैकी कोणत्याही पर्यायावर क्लिक करून कोड प्राप्त करावा. कोड एंटर केल्यानंतर Turn On वर टॅप करावे. ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे अकाउंट सुरक्षित राहणार आहे.
सूचना – ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जेव्हा कधी तुम्ही गूगल अकाउंट लॉगइन करताल, तेव्हा पासवर्डसोबत तुमच्या डिव्हाइसवर एक नोटिफिकेशन येईल. या नोटिफिकेशनवर टॅप केल्यानंतर तुमचे गूगल अकाउंट खुले होईल. याच्याविना पासवर्डच्या मदतीने तुम्ही अकाउंट खुले करू शकणार नाही.