मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
वीजेची बचत राष्ट्रीय संपत्तीची बचत होय. विजेच्या उपकरणांचा वापर योग्य केल्यास वीज बील अर्ध्याहून कमी येईल, घरातील काही डिव्हाइसचा वापर बंद केल्यानंतर अथवा त्याला पर्याय शोधल्यास, आपण घराचे वीज बील मोठ्या प्रमाणावर कमी करू शकता. तसेच यामुळे आपल्याला काही त्रासही होणार नाही.
आजकाल प्रत्येक घरात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर वाढला असून यामुळे वाढते लाईट बिल अनेकांची डोकेदुखी बनले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला घराचे वीज बिल कमी करायचे असते. परंतु, अनेक उपकरणांच्या सतत वापरामुळे हे शक्य होत नाही.पण, काही उपकरण काढून टाकल्यानंतर किंवा त्यांचा वापर कमी केल्यानंतर घराचे वीज बिल कमी करू शकता. कोणत्या मार्गांनी बिल कमी करता येईल, यात कोणतीही अडचण येणार नाही. हे जाणून घेऊ या…
घराचे वीज बील हे बऱ्याच लोकांसाठी डोकेदुखी बनले आहे. यामुळे बरेच जण घराचे वीजबील कमी कसे येईल, यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, काही डिव्हाइसचा सातत्याने वापर केल्याने हे शक्य होत नाही. यामुळे घरातील काही डिव्हाइसचा वापर बंद केल्यानंतर अथवा त्याला पर्याय शोधल्यास, आपण घराचे वीज बील मोठ्या प्रमाणावर कमी करू शकता. तसेच यामुळे आपल्याला काही त्रासही होणार नाही.
आपला भारत देश हा कितीही प्रगत झाला असला तरी कित्येक खेडेगावांत आजही सुखसुविधांचा अभाव आहे. त्यातलीच एक सुविधा म्हणजे वीज. अशी कित्येक गावं आहेत जी आजही अंधारात आहेत. शहरी भागांत राहणारी मंडळी ब-याचदा विजेचा अपव्यय करतात. तो अपव्यय कमी केला आणि वीजेची बचत केली तर अंधारात जीवन जगणा-यांनासुद्धा वीज मिळेल. विज्ञानानुसार वीज ही निर्माण करावी लागते. विजेचं उत्पादन व वहन यासाठी लाखो मीटरच्या वाहिन्यांचे जाळं व उपकेंद्रं निर्माण करावी लागतात.
धातूमधून वीज वाहून नेली जाते त्या धातूमुळे काही प्रमाणात विजेची घट होते. याचाच अर्थ असा की, विजेचं वहन होत असताना, काही प्रमाणात वीज वाया जाते. यासाठी सगळ्यांनी विजेचा योग्य वापर केला तर विजेची बचत होईल. ज्यांच्या घरात वीज येत नाही त्यांना वीज मिळेल. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अगदी साध्या-सोप्या पद्धतींचा वापर करून वीज वाचवता येऊ शकेल. घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसंच ऊर्जा बचतीचं प्रमाणपत्र लाभलेल्या उपकरणांचाच वापर करावा.
भारतात सूर्यप्रकाशाचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे सोलार अर्थात सूर्याच्या प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करता येईल. मॉडर्न असणा-यांना ही गोष्ट कदाचित पचनी पडणार नाही, पण आपल्या प्रयत्नांनी एखाद्याच्या घरातला अंधार दूर होत असेल तर हे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.विजेची उपकरणं स्वच्छ असतील तरंच जास्त ऊर्जा मिळेल आणि विजेचा वापर कमी होईल.
इस्त्रीची निवड करताना, ऑटोमॅटिक इस्त्री खरेदी करावी. जेणेकरून विशिष्ट तापमानाला इस्त्री बंद होईल. फ्रिजमधून वस्तू काढताना आवश्यक वस्तू एकदाच काढाव्यात, जेणेकरून फ्रिज सतत उघडावा लागणार नाही. सतत फ्रिज उघडल्याने फ्रिजचं तापमान बिघडतं आणि जास्त वीज खर्च होते. डीफ्रॉस्ट करावे लागणारे रेफ्रिजरेटर्स आणि फ्रिजर्स नियमितपणे डिफ्रॉस्ट करावेत, बर्फ जमा झाल्यामुळे मोटर चालू ठेवण्यासाठी फ्रीजला जास्त ऊर्जा लागते. रेफ्रिजरेटर व भिंत यांच्यामधे पुरेशी जागा ठेवावी, रेफ्रिजरेटरच्या भोवती हवा सहजपणे खेळती राहिल. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले पदार्थ झाकून ठेवावेत.
कित्येक जण सायंकाळी दिवे लावतात आणि हे दिवे गरज नसतानासुद्धा रात्रभर चालू असतात. ज्या खोलीत कमी वावर असेल किंवा कोणीही नसेल त्या खोलीचे दिवे बंद करावेत. कित्येकदा एका खोलीत दोन दिवे, लॅम्प असतात, घराला आकर्षक बनवण्यासाठी या दिव्यांचा वापर केला जातो. अनावश्यक दिवे गरज नसल्यास बंद करावेत. शहरातील काही भागात विद्युतपंपाने टाकीत पाणी चढवावं लागतं. बऱ्याचदा टाकी भरून वाहत असतानासुद्धा माणसं विद्युतपंप बंद करत नाही किंवा त्यांच्या लक्षातच राहत नाही. यामुळे पाण्याचा आणि विजेचा अपव्यय होतो.
वॉशिंग मशीन, ओव्हन, रोटीमेकर यांसारख्या वस्तू वापरताना टायमरचा वापर करावा आणि टायमर वाजला की लगेच उपकरण बंद करावेत, एसी, टीव्ही रिमोटने बंद केले जातात, पण त्याचा मेन स्विच बंद करण्यासाठी दुर्लक्ष केली जाते. असं न करता रिमोटने टीव्ही, एसी बंद केल्यानंतर लगेचच मेन स्विच बंद करावा. एसीचं बीलही जास्त येतं तसंच वीजही जास्त खर्च होते. काही जण एकदा एसी बसवल्यानंतर तो खराब होईपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.
हल्ली सगळेच जण सीएफएल दिवे किंवा ट्युब्स वापरतात. कारण त्याने विजेची बचत होते. हे खरं आहे की सीएफएलमुळे वीज बचत होते पण, ही उपकरणं सुरुवातीच्या काही सेकंदात अधिक वीज खेचतात. सीएफएल ट्यूब सुरू केल्यानंतर जेवढी ऊर्जा खेचते, त्या उर्जेत ती नंतर दोन तास ऊर्जा देते. म्हणून सीएफएल दिवे, ट्युब लावल्या नंतर किमान तीन तास तरी तो बंद करू नये. जितक्या वेळा हे दिवे चालू बंद केले जातील तितक्या वेळ अधिक ऊर्जा खर्च होते आणि त्याचं आयुष्यही कमी होतं. त्यामुळे आधुनिक सीएफएल दिवे चालू केल्यावर जास्त वेळ ठेवा.
उपकरणांमध्ये कॉइलचा वापर केला जातो ती सगळीच उपकरणं अधिक वीज खातात. त्यात सर्वाधिक वीज खाणारा म्हणजे पंखा. कित्येकांच्या घरी पंखा दिवस-रात्र चालू असतो. त्या पंख्याला जराही विश्रांती मिळत नाही. त्यामुळे पंखा जास्तीत जास्त उर्जा खेचून घेतो आणि त्याची हवा कमी लागते. देवाच्या देव्हाऱ्याचा झीरो बल्ब सतत सुरू असतो. झीरो बल्ब असला तरी हा बल्ब सुमारे १५ वॉटचा असतो. या झीरो बल्बपेक्षा सीएफएलचा तीन वॉल्टचा बल्ब लावावा. त्याचा उजेडही जास्त येतो. त्यामुळे वीजही फारशी खर्च होत नाही.
आंघोळीसाठी पाणी गरम करताना गिझरचाच प्रामुख्याने वापर केला जातो. काही जणांना अगदी कडकडीत पाणी लागतं म्हणून आंघोळ होईपर्यंत गिझर चालू ठेवतात. यामुळे वीज खर्च होते. या गोष्टीला आळा बसण्यासाठी बादलीत एकदाच पाणी घ्यावं आणि गिझर लगेचच बंद करावा. घरात गिझरलाही मोठ्या प्रमाणावर वीज लागते. यामुळे विजेवर चालणारे गिझर हे आपल्यासाठी डोकेदुखीही ठरू शकते. यामुळे याला काही तरी दुसरा पर्याय निवडणेच योग्य आहे. याला गॅस गिझर हा एक चांगला पर्याय आहे.
आपल्या स्वयंपाक घरात बऱ्याच वेळा चिमनीचा वापर केला जातो. मात्र, ही चिमनी सर्वाधिक वीज लागणाऱ्या डिव्हाईसच्या यादीत सामील आहे. यामुळे वीजबील मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत चिमनीचा वापर करणे अनेक वेळा आवश्यक बनते. मात्र, या चिमनीला पर्याय म्हणून अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे आपले वीज बील मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
घरातील AC देखील सर्वाधिक वीज लागणाऱ्या डिव्हाइसच्या यादीत आहे. मात्र, हे एक असे डिव्हाइस आहे. जे आपण घरातून काढूही शकत नाही. मात्र, आपण Non-Inverter AC ऐवजी Inverter AC चा वापर करू शकता. Inverter AC चा अर्थ, हा एसी वीज वाचविण्यासाठी बेस्ट आहे. कारण याच्या आउटडोरमध्ये PCB लावलेला असतो. जो कॉम्प्रेसरची स्पीड रेग्युलेट करतो.
How to Reduce Electricity House Tips
Electric Bill