विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना लस घेतल्यानंतर संसर्गाबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्न निर्माण होतात. जगातील सर्वच देश आणि लस उत्पादक कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, कोरोना रोखण्यासाठी कोणतीही लस पूर्णपणे प्रभावी नाही. या लसीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, तसेच शरीरास विषाणूशी लढण्यास सामर्थ्य मिळते. लस फक्त कोरोना संसर्गाची गती रोखू किंवा कमी करू शकते. यानंतरही लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. लस घेतल्यानंतरही बाधित न होण्यासाठी कोणते नियम पाळावेत आणि काय करावे ते बघू या…
यासंदर्भात दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख प्राध्यापक आणि डॉक्टर जुगल किशोर यांचे म्हणणे आहे की, लस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीने दुर्लक्ष केले तर त्याला संसर्ग होण्याची शक्यता असते.
लस डोस घेतल्यानंतर आपण एका ते दोन आठवड्यांपर्यंत स्वत: ला विलगीकरणात ठेवल्यास संसर्ग होण्याची शक्यता टाळली जाऊ शकते. यामुळे ती व्यक्ती बाहेर गेली नाही तर बाहेरून संक्रमणाचा धोका होणारच नाही. तसेच एखाद्या मार्गाने संक्रमित झाली तरी तिला इतरांकडून संक्रमित होण्याचा धोका संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत, संक्रमण साखळी तोडण्यात मदत होऊ शकते.
प्रा. जुगल किशोर पुढे असे म्हणाले की, दोन आठवड्यांच्या दरम्यान स्थिती खराब झाली नाही आणि सर्व काही सामान्य राहिले तर सर्वजण सावधगिरीने त्यांचे जीवन सामान्य करण्याच्या दिशेने जाऊ शकतात. मात्र लस घेतल्यानंतरही काही प्रमाणात लोक संक्रमित होतात. कारण या लसीचा परिणाम सुमारे १० टक्के लोकांवर विपरित परिणाम होऊ शकतो, असे केवळ भारताबद्दलच नाही तर जगभरात दिसून आले आहे. तसेच भारतात त्याची संख्या अधिक आहे, कारण आमच्या देशांत इतर देशांपेक्षा लोकसंख्या जास्त आहे. असे असूनही लोकांनी लसीबाबत सकारात्मक दृष्टीकोन राखला पाहिजे. लस घेतल्यानंतर गंभीर पातळीवर संक्रमणाची शक्यता कमी होते. लसीचा एकच डोस लोकांना कित्येक महिन्यांपर्यंत संरक्षण देखील देतो. म्हणूनच, लस कमीतकमी एक डोस लोकांनी घ्यावा.