मोबाईलवर बोलण्याच्या पद्धतीवरून कळतो स्वभाव!
आपल्या विविध प्रकारच्या सवयींचे निरीक्षण केल्यास काही प्रमाणात स्वभावाचा अंदाज करता येतो. मोबाईलवर बोलणे त्यापैकीच एक आहे. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया…..
पंडित दिनेश पंत
– सतत खाली पाहून मोबाईलवर बोलत असल्यास, आपला खाजगी विषय कुणापुढे प्रकट न करण्याची सवय असते…
– प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात प्रत्येक फोनवर बोलत असल्यास, असे लोक मागचा पुढचा विचार न करता मदतीला धावतात…
– प्रमाणापेक्षा बारीक आवाजात मोबाईलवर बोलणारे इतरांपेक्षा खूपच वेगळ्या आवडी निवडी बाळगून असतात….
– देवाच्या नावाचा उच्चार करून फोन स्वीकारणारे इतरांचे प्रश्न जाणून घेण्यात रस असणारे असतात….
– बारीक डोळे करून समोर बघत फोनवर बोलणारे, छोट्या छोट्या विषयावर वाद घालू शकतात……
– खूप पॉज घेऊन बोलणारे महत्त्वाच्या विषयावर कनफ्यूज असतात……
– उत्तम श्रोते असणारे, समोरच्यालाच अधिक बोलू देणारे, शांतपणे मोठ्यात मोठ्या समस्येतून मार्ग काढतात…..
– प्रत्येक फोन हसत हसत घेणारी व्यक्ती गोड पदार्थ आवडणारी असते….
– सदैव व्हायब्रेशन मोडवर फोन ठेवणारी व्यक्ती प्रत्येक विषयावर गंभीर असते….
– धार्मिक रिंगटोन असणारे, सामाजिक कार्यात पुढे असतात….
– फोन सदैव सायलेंटवर ठेवणारे कलाकार एखाद्या विषयात खूपच तज्ञ असतात….
– प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात रिंगटोन ठेवणारे अनप्रेडिक्टेबल असू शकतात….
– शांत प्रसंगात रिंगटोन सायलेंट करायची विसरणारे प्रसंग पडल्यास मदतीला सर्वात आधी धावून येतात….
– प्रत्येक वेळी पहिल्या रिंगला फोन उचलणारे व्यवहारिक व सुरक्षित गुंतवणूक करणारे असतात….
– किती वाजले तरी क्वचित फोन उचलणारे प्रत्यक्ष भेटीत मात्र मित्र प्रिय असतात…..
– आठवणीने स्वतःहून फोन करणारे, बारीक-सारीक भावना जपणारे असतात……
– उजव्या व डाव्या कानाला आळीपाळीने फोन लावणारे, प्रत्येक प्रसंग सविस्तर समजून घेत असतात….
– फोनवर बोलताना दुसरा हात तोंडाला कवर करून बोलणारे, बऱ्यापैकी अबोल असतात….
– कुठेना कुठे फोन विसरणारे, चांगले इव्हेंट मॅनेजर असतात….
– नियमित नवनवा फोन घेणारे स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल जरा जास्त जागरूक असतात…
– फोनवर बोलण्याचा कंटाळा येणारे स्थिर गुंतवणूकदार असतात….
– आपण देखील निरीक्षण करा अनुभव घ्या…..