विशेष प्रतिनधी, नाशिक
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शरीरातील ऑक्सिजन पातळी घटते. त्यामुळे ऑक्सिजनची शोधाशोध सुरू होते. वाढत्या बाधितांमुळे ऑक्सिजन मिळण्यात अडचणी येतात. परिणामी घरच्या घरीच ऑक्सिजनची पातळी तपासण्याचा सल्ला दिला जातो. ऑक्सिमीटरच्या सहाय्याने आपण शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासू शकतो. पण, ही पातळी नक्की किती असावी हेच माहित नसते.
त्यामुळे आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊ की ऑक्सिजनची पातळी नक्की किती असावी.
जर ऑक्सिजनची पातळी ९४ असेल तर ती चांगली म्हटली जाते.
जर ऑक्सिजनची पातळी ९० ते ९३ च्या दरम्यान असेल तर ती कमी म्हटली जाते.
आणि
जर ऑक्सिजनची पातळी ८८ ते ८९ या दरम्यान असेल तर ती फार कमी समजली जाते.
त्याचबरोबर
आता आपण जाणून घेऊ की, हृदयाचे ठोके (पल्स रेट) किती असावेत
एका मिनिटाला हृदयाचे ठोके जर ७२ असतील तर ते आदर्श (स्टँडर्ड) समजले जातात.
एका मिनिटाला हृदयाचे ठोके जर ६० ते ८०च्या दरम्यान असतील तर ते सामान्य (नॉर्मल) समजले जातात.
एका मिनिटाला हृदयाचे ठोके जर ९० ते १२० असतील तर ते उच्च पातळीचे (हाय) समजले जातात.