पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोक्यावरील केस प्रत्येक स्त्री-पुरुषांची अभिमानाची आणि सौंदर्याची गोष्ट मानले जाते. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तर लांबसडक सुंदर आणि आकर्षक केस सौंदर्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या केसांची निगा राखत असतो. एवढे करूनही केस गळती ही एक प्रकारे जागतिक समस्या बनली आहे.
पूर्वीच्या काळी केस गळती ही साठीनंतर होत असे. परंतु आता तरुण वयात देखील केले होते त्यामुळे यावर काय उपाययोजना याबाबत अनेकांना माहिती हवी असते. त्यातच हिवाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळणे होय. जेव्हा तुमचे केस तुटतात आणि पुन्हा वाढणे थांबते तेव्हा ही समस्या अधिक वाढते. अशा स्थितीत तुम्ही केस पूर्णपणे काळजी केली पाहिजे, म्हणजेच तुम्हाला आधी शॅम्पू आणि केसांचे तेल बदलावे लागेल.
हिवाळा सुरू होताच, केस गळणे आणि कोरडी त्वचा यासारख्या समस्यांमुळे अनेकांना त्रास होऊ लागतो. त्यातून आराम मिळवण्यासाठी कधी केसगळतीविरोधी शॅम्पू, कधी कॉस्मेटिकपासून ते सप्लिमेंट्सपर्यंत सगळेच प्रयत्न करतात. मात्र त्याचा केसांवर किंवा चेहऱ्यावर कोणताही चांगला फरक नाही. केस गळणे यासारख्या समस्यांनी त्रस्त असल्यास तर हिवाळ्यात हवेत बदल होताच या विविध प्रकारच्या तेलांचा समावेश करावा, त्याचा फायदा होऊ शकतो.
केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी मोगरा तेल खूप फायदेशीर मानले जाते. काही आरोग्य तज्ज्ञ मोगरा तेलाचा वापर स्नायूंमध्ये होणारा त्रास कमी करण्यासाठी देखील शिफारस करतात. तसेच केसगळती दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा मोगरा तेल गरम करून टाळूची मालिश करावे. तसेच सध्या बाजारात खोबरेल तेल, बदामाचे तेल, तिळाचे तेल मिळणे खूप सोपे आहे, पण पूर्णपणे केमिकलमुक्त हर्बल शॅम्पू मिळणे खूप अवघड आहे. या परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी हर्बल शॅम्पू बनवू शकता.
हर्बल शैम्पू बनवण्यासाठी साहित्य :
सुका आवळा 100 ग्रॅम, रीठा 100 ग्रॅम, शिककाई 100 ग्रॅम, मेथी दाणे 50 ग्रॅम घ्यावे.
असा बनवा हर्बल शॅम्पू
प्रथम आवळा, रेठा, शिककाई आणि मेथीचे दाणे स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर रात्रभर दोन ग्लास पाण्यात एकत्र भिजत ठेवा. सकाळी ते सर्व हाताने चांगले मॅश करून गॅसवर गॅसवर शिजवण्यासाठी ठेवा. या वेळी गॅसची ज्योत मंद ठेवावी हे लक्षात ठेवा. जेव्हा त्याचे पाणी दोन ग्लासांपासून एका ग्लासपर्यंत राहते, तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. चांगले थंड झाल्यावर दुसऱ्या भांड्यात गाळून बाटलीत भरून ठेवा. हा झाला होममेड हर्बल शाम्पू तयार आहे. आता सर्वप्रथम एका मगमध्ये पाणी घेऊन झाकण न लावता त्यात शॅम्पू टाका. चांगले मिक्स केल्यानंतर केसांना आणि टाळूला शॅम्पू लावून फेस तयार करा.केस साफ करताना विशेष काळजी घ्या की केस जास्त चोळून घेतल्याने केस तुटणार नाहीत.