अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आपली ओळख, पत्ता पडताळण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. आधारमध्ये संवेदनशील माहिती असल्याने ते सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. आधार कार्डसाठी अर्ज करताना लोकांना त्यांचे डोळे आणि फिंगरप्रिंट स्कॅन डेटा द्यावा लागेल. ही बायोमेट्रिक माहिती इतर सेवा वापरताना ओळख पडताळण्यासाठी वापरली जाते.
तुमचा बायोमेट्रिक डेटा UIDAI सर्व्हरवर लॉक करून तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते कुठेही अनलॉक केले जाऊ शकते.
तुमचा बायोमेट्रिक डेटा ऑनलाइन लॉक करण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या पहा:-
पायरी १ – सर्व प्रथम UIDAI वेबसाइटवर जा. My Aadhaar and Aadhaar Services अंतर्गत Aadhaar Lock and Unlock Service वर क्लिक करा
पायरी २ – तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक करण्यासाठी लॉक UID निवडा.
पायरी ३ – १२ अंकी आधार क्रमांक टाका.
पायरी ४ – तुमचे पूर्ण नाव आणि पिनकोड एंटर करा.
पायरी ५ – आता सुरक्षा कोड प्रविष्ट करा.
स्टेप ६ – send OTP वर क्लिक करा आणि एंटर करा.
पायरी ७ – नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे OTP पाठवला जाईल.
पायरी ८ – पडताळणी केल्यावर, स्क्रीनवर एक मेसेज येईल. ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक यशस्वीरित्या लॉक झाला आहे असे लिहिलेले असेल.
आधार बायोमेट्रिक डेटा ऑनलाइन अनलॉक करण्यासाठी पायऱ्या
पायरी १ – UIDAI वेबसाइटला भेट द्या. My Aadhaar and Aadhaar Services अंतर्गत, Aadhaar Lock and Unlock Service वर क्लिक करा.
पायरी २ – आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी क्रमांक प्रविष्ट करा.
पायरी ३ – दिलेला कॅप्चा कोड टाका.
पायरी ४ – OTP पाठवा वर क्लिक करा.
पायरी ५ – OTP एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा.
बायोमेट्रिक डेटा लॉक आणि अनलॉक करण्यासाठी, तुम्हाला व्हर्च्युअल आयडी तयार करणे आवश्यक आहे. व्हर्च्युअल आयडी UIDAI वेबसाइटला भेट देऊन मिळवता येईल. त्याच वेळी, तुम्ही १९४७ वर एसएमएस पाठवून देखील ते मिळवू शकता.
sms पाठवून असे करा आधार कार्ड लॉक
नोंदणीकृत क्रमांकावरून १९४७ वर GETOTP असा मेसेज पाठवावा लागेल. यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा OTP LOCKUID आधार क्रमांक टाइप करून १९४७ वर पाठवावा लागेल. यानंतर आधार कार्ड लॉक होईल. तर, अनलॉक करण्यासाठी, व्हर्च्युअल आयडीचे शेवटचे ६ अंक लिहून १९४७ वर पाठवावे लागतील.