नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जीवन विमा अर्थात LIC च्या ग्राहकांसाठी खुषखबर आहे. वेळोवेळी आपली पॉलिसी ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. बहुतांशवेळा कामाच्या व्यापात विमा हफ्ते भरणे लक्षात राहत नाही. त्यामुळे वेळोवेळी पॉलिसी स्टेटस चेक करणे आवश्यक आहे. पॉलिसी स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी विमाधारकांना रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागणार आहे. त्या नंतर आपल्या अधिकृत ईमेल आयडियावर कन्फर्मशेन पाठवले जाते.
अशी आहे प्रक्रिया…
– licindia.in या अधिकृत वेबसाईटद्वारे आपले रजिस्ट्रेशन करा.
– युझर आयडी आणि पासवर्ड निवडा
– e-services चा पर्याय निवडून त्यावर आपली माहिती पूर्ण भरा आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
– त्यानंतर आपला पॉलिसी नंबर टाकून पॉलिसी कन्फर्म करा.
– संबंधित फॉर्म पूर्ण भरल्यावर प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून त्याचा फोटो अपलोड करा.
– पॅन कार्ड किंवा आधार कार्डचा फोटो काढून तो अपलोड करा.
– सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर LIC अधिकाऱ्यांनी कन्फर्म केल्यावर आपल्याला मेसेजद्वारे पॉलिसी स्टेटस चेक करता येणार आहे.