विशेष प्रतिनिधी, पुणे
बरेचदा आपल्याला शंका येते की आपल्या नावावर कुणीतरी दुसरेच आपला मोबाईल नंबर वापरत आहे. पण आता टेंशन घेण्याची गरज नाही. कारण त्यावरचा एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यातून आपला मोबाईल नंबर दुसरा कुणी आपल्या नावावर वापरत असेल तर त्याची लगेच माहिती मिळते.
दूरसंचार विभागाने स्पॅम आणि फ्रॉड कॉल रोखण्यासाठी www.tafcop.dgtelecom.gov.in पोर्टल लॉन्च केले आहे. त्या माध्यमातून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की कोण तुमचा मोबाईल नंबर वापरतोय. त्यासंदर्भात तुम्ही तक्रारही नोंदवू शकता.
त्यासाठी सर्वांत पहिले वरील संकेतस्थळावर जा आणि आपला मोबाईल नंबर एन्टर करा. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या नावावर अॅक्टीव्ह असलेले सर्व नंबर्स येतील. तुम्ही आपल्या हिशेबाने कोणताही नंबर रिपोर्ट करू शकता. मात्र दूरसंचार विभागाचे हे पोर्टल निवडक सर्कलमध्येच उपलब्ध आहे.