चहा पिण्याच्या पद्धतीवरून स्वभाव
– पंडित दिनेश पंत
चहा पिण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी पद्धत असते. त्याचे निरीक्षण केल्यास स्वभावाचा बर्यापैकी अंदाज घेता येतो. आपणही निरीक्षण करा आणि अंदाज बांधा…..
– चहा घ्यायचा का चला चहा घेऊ, स्वतःहून अशी ऑफर देणारे सर्वसमावेशक स्वभावाचे असतात. यांचा फारसा कुणाशी वाद नसतो…..
– चहाला प्रथमदर्शनी नाही म्हणणारे परिस्थितीचा अंदाज घेऊन वागत असतात….
– मोठा भुरका मारून चहा पिणारे फारशी कोणाची तमा बाळगत नाहीत. जे योग्य वाटेल ते करून मोकळे होतात….
– गरम चहा पटकन पिऊन टाकणारे सतत गंभीर विचार करत असतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेचे टेन्शन घेतात…
– चहाचा प्रत्येक घोट आस्वाद घेऊन पिणारे महत्त्वाच्या ठिकाणी उशिरा पोहोचतात…
– चहाचा ग्लास अथवा कप हाताने पूर्ण कव्हर करून पिणारे केअरिंग असतात. आजारी व्यक्तीची जरा अधिक चौकशी करतात…
– चहा गार अथवा गरम याचा फारसा विचार न करता पिणारे व्यवहार कुशल असतात….
– विशिष्ट प्रकारच्या चहाची ऑर्डर देणारे फारसे कुणात मिसळत नाहीत….
– विशिष्ट ठिकाणीच चहा घेणारे पटकन गैरसमज करून घेऊ शकतात…..
– चहा पिता पिता एखादा विनोदी किस्सा सांगणारे थोडेसे बेफिकीर असतात….
– ग्लास अथवा कप विशिष्ट पद्धतीने धरूनच चहा पिणारे एखाद्या विषयात तज्ञ असतात…..
– सर्वांसाठी चहा सांगतात, पण स्वतः घेत नाहीत, असे चांगला सल्लागार असतात. क्षणात परिस्थिती ओळखतात….
– नियमित प्रकारातला चहा न घेता विशिष्ट पद्धतीचा चहा घेणारे अबोल अनप्रेडिक्टेबल असतात….
– चहा शिवाय ज्यांची बॅटरी चार्ज होत नाही, अशी मंडळी महत्वाच्या निर्णयाची बऱ्याच ठिकाणी खात्री करतात…
– बसूनच शांतपणे चहाचा आस्वाद घेणारे कमी लाभाची परंतु खात्रीशीर गुंतवणूक करतात…..
– बशीतून चहा घेणारे कोणत्याही बाबतीत लवकर कन्व्हिन्स होत नाहीत…..
– चहा घ्यायचा म्हणून घेणारे गाव मित्र असतात….
– चहा गार करून पिणारे कलाकार असतात. बोलताना अचूक शब्द वापरण्याकडे कल असतो…
– चहाची वेळ अजिबात न चुकवणारे, प्रसंगी एकटा चहा पिणारे सहजपणे शब्दाला अडकतात….
– अधून-मधून चहा घेणारे नर्मविनोदी असतात….
– चहा संपेपर्यंत अजिबात न बोलणारे चिडखोर असू शकतात…..
– चहासोबत बिस्किट खारी अथवा पाव खाणारे कोणत्याही परिस्थितीत मध्यम मार्ग स्वीकारतात…..
– कोणत्याही प्रकारचा चहा बिलकुल वर्ज असणारे लोक स्वतःच करून घेतलेल्या एका विशिष्ट चौकटीत राहत असतात….
आपणही आपले निरीक्षण नोंदवा…