मुंबई – आपल्या देशात 4G स्मार्टफोन नंतर आता 5G स्मार्टफोनचे सर्वांनाच वेध लागलेले आहेत. विशेषतः तरुणाईमध्ये 5G स्मार्टफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. 5G स्मार्टफोनची संकल्पना भारतात पूर्णपणे नवीन असली तरी स्मार्टफोन कंपन्या 5G च्या नावाने स्मार्टफोनची बेमुदत विक्री करत आहेत. काही कंपन्या ग्राहकांना त्यांचा 5G स्मार्टफोन सर्वोत्तम कसा आहे हे सांगत नाहीत. कारण बहुतेक स्मार्टफोन कंपन्या एकाच 5G बँडसह स्मार्टफोन विकत आहेत. तसेच सिंगल बँड असलेला स्मार्टफोन 4G फोन सारखाच 5G बँड आहे. त्यामुळे सर्वोत्तम 5G स्मार्टफोन कसा ओळखावा ते जाणून घेऊ या…
किती बँडचा 5G फोन सर्वोत्तम
अधिक बँड असलेल्या 5G स्मार्टफोनला अधिक वेग मिळतो. तसेच जास्त लोक एकच 5G बँड वापरतील, तर तुम्हाला कमी वेग मिळू शकेल. पण अधिक बँड असतील तर तुमचा स्मार्टफोन दुसऱ्या बँडमध्ये शिफ्ट होऊन यामुळे उत्तम 5G स्पीड मिळेल. एक किंवा दोन 5G बँड असलेला स्मार्टफोन चांगला नाही. हा भविष्यातील 5G स्मार्टफोन नाही.
5G बँडचे दोन प्रकार
यात एक प्रकार म्हणजे FR1 5G बँड असून तो उप -6 GHz बँड आहेत. मात्र ते ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सीच्या आधारावर निश्चित केले जातात. तसेच 600 GHz पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीला सब -6 GHz बँड म्हणतात. हे दोन कमी 5G बँडमध्ये विभागले गेले आहे. तर दुसरा प्रकार म्हणजे FR2 5G बँड होय. हे मिली गीगाहर्ट्झ असून ते 24 ते 22 गीगा हार्ट्स ठेवण्यात आले आहेत. तसेच ते लो 5G बँड आणि मिड 5G बँड मध्ये विभागलेले आहेत.
कोणत्या फोनमध्ये किती बँड?
वनप्लस नॉर्ड 5G स्मार्टफोनला N70 बँड देण्यात आला आहे. वनप्लसच्या बहुतेक 5G स्मार्टफोनमध्ये सिंगल बँड 5G सपोर्ट देण्यात आला आहे. वनप्लस 9 आर 5 जी स्मार्टफोनमध्ये सिंगल 5 जी बँड आहे. त्याचबरोबर वन प्लस 9 आणि वन प्लस 9 प्रो मध्ये दोन 5G बँड देण्यात आले आहेत. आयफोन 12 मध्ये सर्वाधिक बँड उपलब्ध आहेत. आरओजी फोन 5 मध्ये सर्वाधिक 6-गीगाहर्ट्झ बँड आहेत.