विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना उपचारासांठी प्रचंड मागणी असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सध्या देशभरात फोफावला आहे. त्यामुळे साधे पाणी टाकूनही या इंजेक्शनची विक्री होत आहे. आता तर त्यापुढेही जाऊन या इंजेक्शनच्या खोक्यावरच (बॉक्स) अशी काही करामत केली जात आहे की, त्याद्वारे हे इंजेक्शन खरे असल्याचेच भासते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या बनावट रेमडेसिविरचा पर्दाफाश केला आहे. यासंदर्भात पोलिस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांनी माहिती दिली आहे. बनावट रेमडेसिविर ओळखण्यासाठी भारद्वाज यांनी खास दोन फोटो उपलब्ध करुन दिले आहेत. ते खालीलप्रमाणे