विशेष प्रतिनिधी, मुंबई
मॅसेजिंग चॅटमध्ये अनेक अॅप उतरले असले तरीही आज व्हॉट्सअॅपची बरोबरी कुणालाही करता आलेली नाही. बहुतांश लोक व्हॉट्सअॅपच वापरतात. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्येही अनके लोक असे असतील ज्यांच्याशी तुमचे सिक्रेट चॅटिंग होत असेल. ते कुणीही वाचू नये असे तुम्हाला वाटते. त्यामुळे ते डिलीट करण्यावर भर असते. पण आता डिलीट न करताही हे चॅट लपवता येणार आहे. त्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया…
व्हॉट्सअॅप ओपन करा आणि त्यानंतर जे चॅट लपवायचे आहे त्यावर क्लिक करा. त्या चॅटवर होल्ड करून ठेवा. त्यानंतर व काही पर्याय येतील, त्यात एक अॅरो दिसेल. ते आर्काईव्हचे बटण आहे. त्यावर टॅप करा. टॅप करताच तुमचे चॅट आर्काईव्ह होईल आणि कुणालाही दिसणार नाही. ते चॅट बघायचे असेल तर व्हॉट्सअॅपमध्ये सर्वांत खाली स्क्रॉल करत गेल्यावर आर्काईव्हचा पर्याय दिसेल. तिथेच चॅट अनआर्काईव्ह करण्याचाही मार्ग सापडेल.
व्हॉट्सअॅपचे अपकमिंग फिचर
आपल्या खास डिसअॅपिरिंग मेसेजेसच्या फिचरला अपग्रेड करण्याची तयारी व्हॉट्सअॅप करीत आहे. त्यानंतर युझर्सचा मेसेज २४ तासांनंतर आपोआप डिलीट होऊन जाईल. सध्या ७ दिवस मेसेज असतात. आता त्यात चोवीस तासांचे फिचरही अॅड करण्यात येणार आहे. हा पर्याय निवडल्यावर युझर्सचे मेसेजेस चोवीस तासांनी आपोआप डिलीट होऊन जाईल. या फिचरचे टेस्टींग सुरू आहे.