मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – सुमारे वीस वर्ष एखाद्या व्यक्तीस घ्यायचे असेल तर बँकेमध्ये सतरा वेळा चकरा माराव्या लागत असत, तसेच अनेक कागदपत्रे गोळा करून ती बँकेत सादर करावी लागत, इतके करूनही काहीवेळा कर्ज मिळत नसे. परंतु अलीकडच्या काळात बहुतांश बँका तात्काळ कर्ज देण्यास तयार होतात. परंतु घरबसल्या आपल्या मोबाईल एखाद्या अॅप वरून कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे सांगितले तर कोणाला विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे की, या माध्यमातून विनंती केल्यास तत्काळ आपल्याला कर्ज मिळू शकते. कसे ते जाणून घेऊ या…
इन्स्टंट मेसेजिंग अॅप असलेल्या WhatsApp वरून कर्ज मिळू शकते. WhatsApp ने आपल्या युजर्सना कर्ज देण्याची नवी सेवा सुरू केली आहे. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांत कर्ज मिळणार आहे. पण हे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज नसून व्यवसाय कर्ज असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, व्यवसाय करणाऱ्या युजर्सना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.
नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) IIFL फायनान्सने WhatsApp द्वारे व्यवसाय करणाऱ्या युजर्सना कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. एनबीएफसीतर्फे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून त्यामध्ये याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. तसेच याद्वारे त्वरित व्यवसाय कर्ज देणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. यासाठी युजर्सना किमान कागदपत्रांची आवश्यकता असेल. त्याच वेळी युजर्सना पाच मिनिटांत हे कर्ज वितरित केले जाईल. युजर्स दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.
कर्ज देण्यासाठी व्हॉट्सअॅपने कृत्रिम बुद्धिमत्ता बॉट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या बॉटद्वारेच KYC आणि बँक खात्याचे डिटेल्स मॅच केले जातात. तसेच जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर 9019702184 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल. तुम्हाला या नंबरवर हाय मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि व्यवसाय यासारखी माहिती विचारली जाईल.
यानंतर भागीदारीशी संबंधित प्रश्नही विचारले जातील. येथे तुम्हाला टर्नओवरची माहिती देखील विचारली जाईल. सर्व माहिती सबमिट केल्यानंतर, बॉट तुम्हाला तुमचा क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी तपशील देण्यास सांगितले जाईल. तसेच IIFL तुमचा क्रेडिट स्कोर OTP द्वारे व्हेरिफाय करेल. त्यानंतर कर्जाची रक्कम, व्याज दर आणि ईएमआयची संपूर्ण माहिती त्यात दिली जाईल. त्यानंतर कर्ज मंजूर होण्यापूर्वी तुमच्या पात्रतेनुसार कर्जाची रक्कम निवडण्याची संधी मिळेल.
कर्ज घेण्यासाठी, युजर्सला बँक खाते आणि IFSC कोड द्यावा लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमचे कर्जाचे पैसे तुमच्या बँकेत हस्तांतरित केले जातील. क्रेडिट फर्म CASHe द्वारे एक विशेष क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. हे फीचर खासकरून WhatsApp बिझनेस युजर्संसाठी आहे. या सुविधेअंतर्गत, व्हॉट्सअॅप बिझनेस प्लॅटफॉर्म युजर्संना कर्ज मिळू शकणार आहे. यासाठी युजर्संना कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही किंवा त्यांना कोणताही अर्ज भरावा लागणार नाही. मात्र, केवळ पगारदार ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
विशेष म्हणजे या सुविधेअंतर्गत, केवायसी तपासणी आणि पडताळणीची प्रक्रिया एआय-पावर्ड मोडद्वारे पूर्ण केली जाईल. यानंतर तुमची क्रेडिट लाइन ठरवली जाईल. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाईल याची माहिती दिली जाईल. तुम्ही दिलेल्या काही माहितीच्या आधारे क्रेडिट लाइन निश्चित केली जाईल.
how to get loan through WhatsApp without documents money finance