मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोणत्याही व्यक्तीने आपली महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवली पाहिजे, अन्यथा ऐन वेळी कागदपत्रे न सापडल्यास टेन्शन येते. एलआयसी पॉलिसी संदर्भात देखील काळजी घेणे गरजेचे ठरते. पॉलिसी सर्टिफिकेट किंवा बाँड कोणत्याही व्यक्तीला किंवा कार्यालयाला दिले असल्यास, त्यांच्याकडून लेखी लिहून घ्यावी. तसेच पॉलिसीची झेरॉक्स (छायाप्रत ) सोबत ठेवावी
तुमचे पॉलिसी बाँड हरवले का? किंवा चुकून तुमचा पॉलिसी बाँड फाडला गेला आहे? की पाण्यात भिजले? त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) त्यांच्या पॉलिसीधारकांना त्यांचे पॉलिसी बाँड हरवले, फाटले, चुकीचे किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाले तर त्यांची डुप्लिकेट प्रत मिळवण्याची सुविधा देते. डुप्लिकेट पॉलिसी बाँडची प्रत्येक पायरी जाणून घेण्यापूर्वी, एलआयसीचे पॉलिसी बाँड कोणत्या प्रकारचे दस्तऐवज आहे ते समजून घेऊ.
एलआयसीचे पॉलिसी बाँड काय आहे? तर तुमचा पॉलिसी बाँड हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज एलआयसीकडून विम्याची ऑफर स्वीकारल्यानंतर दिला जातो. तुम्ही आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्यातील विमा कराराचा मुख्य पुरावा म्हणून तुम्ही याचा विचार करू शकता. पॉलिसीचा दावा करण्यासाठी हा दस्तऐवज आवश्यक आहे. म्हणजेच, तुम्ही किंवा तुमचा नॉमिनी कोणत्याही दाव्यासाठी एलआयसीकडे गेलात, तर पॉलिसी बाँड दाखवल्याशिवाय दावा करू शकत नाही. पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी बाँड आवश्यक आहे. एलआयसी शिफारस करते की तुम्ही तुमच्या पती/पत्नी/पालक/नॉमिनीला पॉलिसी ठेवलेल्या बाँडबद्दल कळवा. पॉलिसी बाँड कोणत्याही व्यक्तीला किंवा कार्यालयाला दिले असल्यास, त्यांच्याकडून लेखी मान्यता घ्या.
पॉलिसी बाँड हरवला आहे, या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी शक्य ते सर्व करा. आधी ते घरी आणि ऑफिसमध्ये शोधा. नंतर एजंटकडे तपासा. मात्र खात्री झाली असेल की पॉलिसी बाँड आता शोधला जाऊ शकत नाही, तर पॉलिसी बाँडच्या डुप्लिकेट प्रतीसाठी तुमच्या शाखेत अर्ज करा.
ही कागदपत्रे लागतील
फोटो ओळख पुरावा – पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारने जारी केलेले वैयक्तिक ओळखपत्र. (यापैकी कोणतेही एक)
रहिवासी पुरावा – टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट, वीज बिल, रेशन कार्ड, भाडे करार जे तीन महिन्यांपेक्षा जुने नाही. (यापैकी कोणतेही एक)
असा करा अर्ज
सर्व प्रथम, पॉलिसी बाँडच्या नुकसानाबाबत वृत्तपत्रात जाहिरात छापावी लागते. मग किमान महिनाभर वाट पाहावी लागेल. जाहिरात देऊन एक महिना उलटूनही तुमची पॉलिसी न मिळाल्यास डुप्लिकेट पॉलिसी बाँडसाठी अर्ज करू शकता. जाहिरात देण्यापूर्वी, एलआयसीची मार्गदर्शक तत्त्वे नक्कीच तपासा, कारण ही संपूर्ण प्रक्रिया एलआयसीच्या नियमांवर अवलंबून आहे. एलआयसीच्या मते, डुप्लिकेट पॉलिसी तिच्या मालकाला मूळ पॉलिसीसारखेच अधिकार आणि विशेषाधिकार प्रदान करते. त्यामुळे डुप्लिकेट पॉलिसी बाँड्सबद्दल शंका घेऊ नका.
डुप्लिकेट पॉलिसी बाँडसाठी, LIC शाखेला भेट देऊनच अर्ज करावा लागेल कारण सध्या यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही. अर्जामध्ये, तुमच्या पॉलिसीशी संबंधित तपशीलवार माहिती द्यावी लागेल, जसे की तुमचे नाव, नॉमिनीचे नाव, पत्ता, जन्मतारीख इ. याशिवाय स्टॅम्प पेपरही लागतो. तसेच डुप्लिकेट पॉलिसी फी जमा करावी लागेल.
तुम्ही दिलेल्या सर्व माहितीची LIC पडताळणी करते. प्रदान केलेली माहिती योग्य असल्याचे आढळल्यास, डुप्लिकेट पॉलिसी बाँड तयार केले जाईल आणि तुम्हाला दिले जाईल. या पॉलिसी बाँडवर डुप्लिकेट लिहिलेले असते. परंतु यामुळे पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्ती बदलत नाहीत.
how to get duplicate certificate of lic policy life insurance corporation of india bonds