विशेष प्रतिनिधी, मुंबई
आजकाल प्रत्येकजण 4 जी नेटवर्कचा स्मार्टफोन वापरत आहे. 4 जी इंटरनेट घेतल्यानंतरही लोकांना काही वेळा हळू चालणाऱ्या इंटरनेट वेगाचा सामना करावा लागतो. इंटरनेट स्पीड कमी असेल. तर काही टिप्सचा अवलंब करुन इंटरनेटची गती आपण कशी वाढवू शकतो. ते जाणून घेऊ या …
१) इंटरनेटचा वेग वाढवा :
जर आपला मोबाइल इंटरनेट हळू चालत असेल तर प्रथम फोनच्या सेटिंग्ज तपासा. फोन सेटिंग्ज वर जा आणि नेटवर्क सेटिंग्ज पर्यायावर टॅप करा. प्राधान्यकृत नेटवर्क 4G किंवा एलटीई निवडा. तसेच कॅशे भरल्यानंतर, अॅन्डरॉईड फोनचा स्पीड होतो, आणि तो इंटरनेटच्या गतीवर परिणाम करतो. म्हणून वेळोवेळी कॅशे साफ करा. यामुळे मोबाइलचा इंटरनेट वेग वाढेल.
२) एपीएन सेटिंग तपासा :
इंटरनेटचा वेग वाढविण्यासाठी अॅक्सेस पॉईंट नेटवर्क म्हणजेच एपीएन सेटिंग तपासा, कारण एपीएन उच्च गतीसाठी योग्य असणे आवश्यक आहे. सेटिंग्जवर जाऊन एपीएन सेट करा.
३) अॅपवर लक्ष द्या :
फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया अॅप्समुळे इंटरनेटची गतीही मंदावते. कारण ही अॅप्स जास्त डेटा वापरतात. अशा परिस्थितीत सेटिंग्जमध्ये जाऊन ऑटो प्ले आणि डाउनलोड पर्याय बंद करा आणि ब्राउझरमध्ये डेटा सेव्ह मोड उघडा. त्यामुळे आपल्या फोनची इंटरनेट गती वाढवेल.