मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मोबाईलच्या माध्यमातून फवसणुकीच्या घटना वाढत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे बनावट अॅप्सचे वाढते प्रमाण हे होय. या खोट्या अॅप्सना ओळखणे खूप कठीण असते. यापैकी बरेच अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असतात. त्यामुळे खोट्या, बनावट अॅप्सची ओळख कशी पटवावी? काही विशेष गोष्टींची काळजी घेतली गेली, तर बनावट अॅप्स सहजरित्या ओळखले जाऊ शकतात. कसे ते पाहूया.
गुगल प्ले स्टोअरवरील अॅप सुरक्षित असतात असे मानले जाते. परंतु त्याची पूर्ण हमी कोणी घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, चेक पॉइंट रिसर्चच्या संशोधकांनी नुकतेच प्ले स्टोअरवर फ्लिक्स ऑनलाइन नावाच्या बनावट अॅपमध्ये मालवेअर शोधून काढला आहे. हा मालवेअर खासगी डेटा चोरी करता येतोच, शिवाय व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून पसरण्यास सक्षम असतो. या पार्श्वभूमीवर कोणते अॅप वापरवे किंवा कोणते नाही याबद्दल तुम्हाला नेहमी सतर्क राहणे आवश्यक आहे. बनावट अॅप्समध्ये मालवेअर असतात. ते बॅकग्राउंडमध्ये कॉन्टॅक्ट आणि लोकेशनसारखे खासगी डेटा चोरतात.
कोणते अॅप खरे आणि कोणते खोटे हे ओळखण्यात तुम्ही अपयशी ठरत असाल तर डेव्हलपरच्या नावावर टॅप करा. तिथे तुम्हाला युजर्स रेटिंगसह डेव्हलपरने प्रसिद्ध केलेल्या सर्व अॅप्सची माहिती मिळेल. डिस्क्रिप्शन आणि स्क्रिनशॉट प्ले स्टोअर लिस्टिंगची तपासणी केल्यानंतर पुढील गोष्ट डेव्हलपरकडून अपलोड करण्यात आलेले अॅप डिस्क्रिप्शन आणि स्क्रिनशॉट असतात. जर तुम्हाला खूप चुका असलेल्या स्क्रिनशॉटसह नॉन प्रोफेश्नल डिस्क्रिप्शनसारख्या अनेक विसंगती दिसल्या तर असे समजा की तुम्ही बनावट अॅप पाहात आहात.
जर कोणतेही अॅप लोकप्रिय असेल, तर डाउनलोडची संख्या अधिक असते. उदाहरणार्थ, व्हॉट्सअॅप मेसेंजरच्या प्ले स्टोअरवर ५ कोटीहून अधिक अॅप्स इन्स्टॉल झाल्याची माहिती दिसते. बनावट अॅपमध्ये ही संख्या खूप कमी असते. बहुतेक शेकडो किंवा हजारात असते. त्यात युजर्सचे रिव्ह्यू पाहावेत. बनवाट, खोटे अॅप साधारणतः प्ले स्टोअरवर दीर्घकाळ टिकत नाहीत.
फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्रूकॉलरसारख्या लोकप्रिय अॅपसाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध असतात. जर तुम्ही खरे अॅप शोधू शकला नाहीत, किंवा खरे आणि खोटे असा फरक ओळखू शकला नाही तर त्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाउनलोडची लिंक पाहावी. तरीही अॅप खोटे किंवा अज्ञात स्रोताद्वारे डाउनलोड केले तर नाही ना हे सुनिश्चित करा.
साधारणतः गुगल प्ले स्टोअर प्रोटेक्ट तुम्हाला अॅपसह संभाव्य सुरक्षा समस्येसंदर्भात स्वयंचलित इशारा देते. नंतर तुम्ही मालवेअरबाइट्स, बिटडिफेंडर, क्विकहील इत्यादी मोबाईल सेक्युरिटी अॅप्सचाही वापर करू शकता. पर्यायी स्वरूपात तुम्ही Virus Total वेबसाईटवर स्कॅनही करू शकता. एकदा तुम्ही फाइल अपलोड केली तर व्हायरस टोटलद्वारे विविध डेडाबेस स्कॅन करेल आणि ते सुरक्षित आहे की नाही याची तपासणी करेल.