पहिला घास दर्शवतो आपला स्वभाव
जेवणाला सुरुवात करताना आपण पहिला घास ज्या पदार्थाचा घेतो तो बरेचदा आपला मूळ स्वभाव दर्शवत असतो. कसा ते बघू. तसेच आपणही आपले निरीक्षण नोंदवा..
गोड घास
जेवताना गोड पदार्थ पहिल्या घासामध्ये खाणारे स्वप्नाळू असतात
तिखट घास
जेवताना पहिला तिखट घास खाणारे कोणत्याही परिस्थितीत राहण्यास तयार असतात
पाणी पिणारे
जेवण सुरु करण्याआधी पाणी पिणारे मध्यम मार्गी असतात
चटणी कोशिंबीर
पहिला घास म्हणून चटणी अथवा कोशिंबीर खाणारे बारीकसारीक गोष्टींची माहिती ठेवतात
तळलेला पदार्थ
पहिला घास तळलेला पदार्थ (पापड, कुरडई, भजी) खाणारे थोडे हटके पसंती असणारे असतात
भात खिचडी
पहिला घास भात, खिचडी अथवा मसालेभात खाणारे व्यवहारात फार अशी रिस्क घेत नाहीत
तारीफ करणारे
खाण्याबरोबर त्याची तारीफ करणारे समाजप्रिय असतात
कांदा मिर्चीचा ठेचा
वेगळा मागून आणि आवडीने कांदा, मिर्चीचा ठेचा खाणारे वेळप्रसंगी उपयोगी येतात….
भूरका मारणारे
कढीचा भुरका मारणारे चांगले सल्लागार असतात. मध्यस्थीही चांगली करतात
आठवणीने मागणारे
आवडलेला पदार्थ आठवणीने परत मागून घेणारे महत्त्वाच्या वेळी विसरभोळे असतात….
पुढील वेळी पंक्तीत जेवण यावरून राशीँची ओळख यावर रंजक निरीक्षण बघू
तोपर्यंत आपणही आपले निरीक्षण नोंदवा