मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गुगल मॅप्स हे जगातील सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप आहे. आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जगात सर्वत्र या अॅपचा वापर केला जातो. इतकेच नव्हे तर, आजूबाजूच्या नव्या जागांचा शोध घेण्यासाठी तसेच जवळचे पेट्रोल पंप, एटीएम किंवा स्वच्छतागृह शोधण्यासाठीही या अॅपचा वापर केला जातो. हे अॅप खूपच कामाचे आहे हे सांगण्यात आता काही अर्थ नाही. परंतु गुगल मॅप्सवरून आता पैसे सुद्धा कमावता येणार आहे, ही माहिती आपल्यासाठी नवीन आहे. ते कसे, चला जाणून घेऊया.
मॅप अॅनालिस्ट
एक मॅप अॅनालिस्ट ऑनलाइन संशोधन करून आणि तुम्हाला देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देऊन मॅप्समधील माहितीची प्रासंगिकता आणि अचूकता निर्धारित करू शकते. लायनब्रिज ही कंपनी गुगलसारख्या कंपन्यांसोबत काम करते. संशोधन निकाल आणि इतर इंटरनेटशी संबंधित माहिती अचूक आणि वेगाने काम करते आहे की नाही हे सुनिश्चित करण्याचे काम ही कंपनी करते. हे काम लवचिक असून, प्रति तास १० डॉलर (७५६ रुपये) ते १६ डॉलर (१,२११ रुपये) चे मानधन देते.
ऑनलाइन मार्केटिंग कन्सल्टंट
हा दुसरा पर्याय आहे. ऑनलाइन मार्केटिंग कंसल्टंट लहान व्यावसायांमध्ये जास्तीत जास्त ग्राहक खेचून आणण्यासाठी एसईओ, जाहिराती आणि युजर्सकडून तयार करण्यात आलेली सामग्री वापरतात. ते लहान व्यावसायिकांना ऑनलाइन ओळख निर्माण करून देण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ग्राहक मिळवून देण्यासाठी मदत करतात. किंवा त्यांची ऑनलाइन उपस्थिती अशा पद्धतीने अनुकूल करतात जेणेकरून त्यांना अधिक ग्राहक मिळतील. त्यासाठी तुम्हाला मार्केटिंगचे ज्ञान आणि वेब डेव्हलपमेंट कौशल्य असणे आवश्यक आहे.
पॉईंट्स मिळवा
गुगल मॅप्स वारण्यास अधिक योग्य आणि अचूक बनविण्यामध्ये योगदान देण्यासाठी गुगल मॅप्स युजर्सना काही पॉईंट देते. जे ग्राहक आपला अनुभव शेअर करतात किंवा फोटो, व्हिडिओ शेअर करतात, आपल्या उत्तरासह इनसाइट्स देतात, एखाद्या ठिकाणाबद्दल विचारल्यास त्याचे उत्तर देतात, ठिकाणाबद्दलची माहिती संपादित करून माहिती अपडेट करतात, चुकलेले लोकेशन जोडतात, किंवा सत्य तपासून माहितीची पडताळणी करतात अशा ग्राहकांना अॅपकडून पॉईंट्स दिले जातात. जसे जसे पॉईंट्स वाढत जातात, तसे तसे तुमची लेवल वाढत जाते. जर एखाद्या व्यक्तीने २५० पॉईंट्स गोळा केले असतील, तर त्याला एक स्टार मिळतो. जसे हे पॉईंट वाढत जातात आणि लोकल गाइड १५०० पॉईंट, ५००० पॉईंट, १५००० पॉईंट आणि अधिक जशा विविध खुणा पार करत जातात, लोकल गाइडचा स्तर वाढत राहतो. परंतु हे पॉईंट वास्तविक आयुष्यात काहीच उपयोगाचे नाहीत. म्हणजे या पॉईंट्सचे रूपांतर पैशात करता येत नाही. गुगल प्ले स्टोअरवरही या पॉईंट्सचा वापर करता येत नाही. स्पष्टच सांगितले तर या पॉईंट्सचा काहीच उपयोग नाही.