पुणे – फेसबुकचा मालकी हक्क असलेले इन्स्टाग्राम हे प्रसिद्ध सोशल मीडिया अॅप आपल्याला ठाऊक आहे. टिकटॉकवर बंदी आल्यानंतर इन्स्टाग्रामवर शॉर्ट व्हिडिओच्या फिचरचे अनावरण झाले आणि तेव्हापासून युजर्स या अॅपचा चांगलाच वापर करू लागले आहेत. इन्स्टाग्रामवर आपण IGTV वर फोटो, मोठे व्हिडिओ, स्टोरिज आणि शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करू शकतो. परंतु इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आवडला तर तो कसा डाउनलोड करावा हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो. आज आम्ही तुम्हाला इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करण्याची पद्धत सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊयात…
इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करणे खूपच सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करावा लागेल. कारण कंपनीने आपल्या अॅपमध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी विशेष फिचर दिलेले नाही. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्या अशा
१) आपल्या ब्राउझरवर savefrom.net हे सर्च करा आणि ओपन करा.
२) डेस्कटॉपवर आपले इन्स्टाग्राम अकाउंट ओपन करा.
३) जो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्या व्हिडिओची लिंक कॉपी करावी.
४) savefrom.net वर दिलेल्या बॉक्समध्ये व्हिडिओचा यूआरएल पेस्ट करावा.
५) डाउनलोडवर क्लिक करावे.
६) तुमचा व्हिडिओ आता डेस्कटॉपवर डाउनलोड झाला आहे.
व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर असे कोणतेही अॅप उपलब्ध नाही. अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी Video Downloader for Instagram हे एक अॅप आहे.
फोनवर इन्स्टाग्राम व्हिडिओ असा डाउनलोड करा
१) सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
२) Video Downloader for Instagram अॅप डाउनलोड करावा.
३) आता इन्स्टाग्राम ओपन करावे आणि जो व्हिडिओ डाउनलोड करू इच्छितात त्यावर जावे.
४) स्क्रिनच्या वरील उजव्या कोपर्यात असलेल्या तीन बिंदूंना क्लिक करावे.
५) कॉपी केलेल्या लिंकवर टॅप करावे.
६) आता Video Downloader for Instagram ओपन करावे.
७) तुम्ही कॉपी केलेल्या लिंकला अॅप आपोआप पेस्ट करेल.
८) आता व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात होईल.