अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तुमची ओळख गुप्त राहावी म्हणून तुम्हाला तुमचा नंबर आणि नाव कायमचे Truecaller वरून काढून टाकायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, कारण आज आम्ही तुम्हाला Truecaller वरून नाव आणि नंबर काढून टाकण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही Truecaller वरून तुमचे नाव आणि नंबर कायमचे काढून टाकू शकता. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया..
Truecaller वरून नाव आणि नंबर काढून टाकण्यापूर्वी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, Truecaller सर्व वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनच्या अॅड्रेस बुकद्वारे संपर्काचा तपशील तयार करते. जर तुमचा नंबर दुसऱ्याकडे ज्या नावाचे सेव्ह केला असेल त्यातूनही त्या नंबरची ओळख Truecallerला होते आणि तो नंबर तुमच्या नावाने नोंदवला जातो. शिवाय, जर तुम्ही हे अॅप वापरत असाल तर तुम्ही तुमचा नंबर या सेवेतून काढून टाकू शकत नाही. नंबर हटवण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते बंद करावे लागेल. तसेच तुमचा नंबर डिलीट करून तुम्हाला इतरांचे संपर्क तपशील जाणून घेणेही खाते बंद केल्यावर शक्य नाही. पण तरी ते निष्क्रिय कसे करायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला Truecaller अॅप ओपन करावे लागेल. नंतर वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या पीपल या चिन्हावर टॅप करुन नंतर सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर अबाऊत या पर्यायावर गेल्यावर तिथे तुम्हाला Deactivate Account पर्याय सापडेल, जिथून तुम्ही ते निष्क्रिय करू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला Truecaller अॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर उजवीकडे वरच्या गीअर आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर अबाऊत Truecaller या पर्यायामध्ये जा. तिथे तुम्हाला Truecaller Deactivate करण्याचा पर्याय तळाशी मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे खाते येथून निष्क्रिय करू शकता. नंबर हटवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला truecaller च्या अनलिस्ट पेजवर जावे लागेल. देशाच्या कोडसह नंबर टाकून, त्यानंतर अनलिस्ट करण्याचा पर्याय निवडून कारण द्यावे लागेल. त्यानंतर व्हेरिफिकेशन कॅप्चा भरावा लागणार आहे. त्यानंतर Unlist वर क्लिक केले की, Truecaller 24 तासांनंतर तुमचा नंबर हटवेल.