विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना झाल्यास चिंताग्रस्त होण्याऐवजी योग्य औषधे घेणे, वेळेवर ऑक्सिजन, बीपी, शुगर तपासत रहाणे,
योगासह व्यायाम आणि पौष्टिक आहार या त्रिसुत्रीचा वापर केल्यास कोरोनावर मात करता येते, हे अनुभवाचे बोल आहेत, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. व्ही. राम गोपाल राव यांच्या कुटुंबाचे…
सुमारे १७ दिवसानंतर राव यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाला हरवून ते पुन्हा रूटीनमध्ये परतले. प्रो. राव यांचा असा विश्वास आहे की, त्रिसूत्रीचा वापर केला, तर निम्म्याहून अधिक रुग्ण घरी बरे होऊ शकतात. प्रो. व्ही. राम गोपाल राव स्पष्ट करतात की, मार्च २०२० पासून ते आतापर्यंत नियमित कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी डॉ. अनुपमा राव कोरोनासह इतर रुग्णांवर दिल्लीच्या रूग्णालयात उपचार करत आहेत. परंतु गेल्या २५ मार्चला अहवाल पॉझेटिव्ह आला. यानंतर घरात उपस्थित पाच सदस्यांची तपासणी केली असता सर्वांना कोरोना संसर्ग झाल्याची धक्कादायक बातमी कळाली.
परंतु प्रो. यांनी सांगितले की, चिंताग्रस्त होण्याऐवजी आम्ही कोरोना प्रतिबंधक औषधे घरीच वेळोवेळी घेणे सुरू केले. तसेच योगा व्यतिरिक्त व्यायाम केला, पौष्टिक आहार घेतला, वेळेवर ऑक्सिजन, बीपी, शुगर यांची तपासणी केली. त्यामुळे १७ दिवसानंतर संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरविले. तसेच आम्ही एक दिवसही काम सोडले नाही. ध्यान केल्यानंतर, व्यायामाद्वारे ऑफिसची सर्व कामे ऑनलाईन करत राहिलो. सर्व ऑनलाईन मिटिंगचा यात समावेशही होता. यामुळे, संसर्ग झाल्यानंतरही काम करण्यास उशीर झाला नाही. माझा विश्वास आहे की, आपण फिटनेसवर लक्ष केंद्रित केले तर शरीरात अँटीबॉडी आपोआप तयार होतात. म्हणूनच मला किंवा माझ्या कुटुंबाला फारसा त्रास झाला नाही.
दरम्यान, प्रो. राव यांच्या पत्नी आता आयआयटी कॅम्पसमध्ये संक्रमणावर उपचार करीत आहेत. तसेच त्या टेलिकॉन्सिलिंगद्वारे रुग्णालयांमध्ये संक्रमित व्यक्तींवर उपचार करीत आहे. या व्यतिरिक्त जनजागती मोहीमदेखील सुरू करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन रुग्णांना वेळेवर तपासणी व उपचार करता येतील.
कॅम्पसमध्ये पाच ते सहा हजार लोक राहतात. त्यापैकी निवासी, संकुलात मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारीही संक्रमित आहेत. आयआयटी व्यवस्थापनाने त्यांच्यासाठी विशेष आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. कारण शहरातील रुग्णालयात कोठेही बेड नाहीत. म्हणूनच, सुरुवातीपासूनच, औषधासह पौष्टिक आहाराद्वारे कोरोनाची स्थिती हाताळली जाऊ शकते, असेही प्रो. राव यांनी सांगितले.