विशेष प्रतिनिधी, मुंबई
सोन्याच्या दागिन्यांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी सरकारने १६ जूनपासून सर्व ज्वेसर्सना हॉलमार्कवाले दागिने विकण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेक वेळा कमी शुद्धतेचे दागिने २२ कॅरेटचे आहेत असे सांगून ज्वेलर्स दागिने विकतात. परंतु काही ज्वेलर्स हॉलमार्किंगची चुकीची माहिती देऊ शकतात. दागिन्यावंरील हॉलमार्किंग खरीच आहे की नाही हे पाहण्यासाठी काही गोष्टी आपण बघू शकतो.
कशी ओळखावी हॉलमार्किंग
हॉलमार्क हे शुद्धतेचे प्रमाण आहे. हॉलमार्किंग केंद्रांकडून ज्वेलर्स हॉलमार्किंगचे प्रमाणपत्र घेऊ शकतात. भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) या केंद्रांना मान्यता देतात. आपले दागिने हॉलमार्क करून घेण्यासाठी ज्वेलर्स बीआयएसकडून परवाना घेता येणार आहे. हॉलमार्कवाले दागिन्यांचा एक तुकडा तुम्हाला सोन्याची शुद्धता सांगू शकणार आहे. तो १८ कॅरेटचा असो, २० चा किंवा २२ कॅरेटचा असो त्याची शुद्धता सांगता येणार आहे. दागिने खरेदी करताना तुम्हाला तीन खुणा दिसतील. शुद्धता, परखणे, हॉलमार्किंग केंद्राचे ओळखचिन्ह आणि ज्वेलर्सचे ओळख चिन्ह किंवा संख्या.
दागिने कसे तपासावेत
तुम्हाला देण्यात आलेली माहिती खरी आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी बीएसआयकडे नोंदणी केलेल्या ज्वेलर्सकडून दागिने खरेदी करावेत. बीएसआयचा परवाना दाखविण्याची मागणी तुम्ही ज्वेलर्सकडे करू शकतात. पुढील काम आहे बिल तपासण्याचे. नियमांनुसार ज्वेलर्सना हॉलमार्किंग शुल्काची माहिती वेगळी द्यावी लागते. एएचसी ३५ रुपये प्रति पीस असे शुल्क आहे. बिल किंवा पावतीमध्ये प्रत्येक वस्तूंचे विवरण, किमती धातूचे शुद्ध वजन, कॅरेटमध्ये शुद्धता आणि सुंदरता आणि हॉलमार्किंग शुल्क वेगवेगळे असले पाहिजे.
अहवाल आल्यावर पुढे काय
जर तुम्ही अजूनही अनिश्चित असाल, तर तुम्ही बीआयएस मान्यताप्राप्त एएससीकडून तुमच्या दागिन्यांची तपासणी करू शकता. हे केंद्र प्राधान्याने ग्राहकांच्या दागिन्यांची तपासणी करतात. तपासणीनंतर एएचसी एक अहवाल जारी करेल. बिलामध्ये सांगितल्याप्रमाणे दागिन्यांची शुद्धता कमी आढळल्यास प्रमाणीकरण केलेल्या एएचसीला ग्राहकांचे शुल्क परत करावे लागतील. ग्राहकांची फसवणूक करण्यात ज्वेलर्सही तेवढेत जबाबदार असतात. त्यामुळे शुद्धतेचा अहवाल आल्यानंतर तुम्ही ज्वेलर्सशी थेट संपर्क साधू शकतात.