उन्हाळ्यात आपल्या त्वचेची, केसांची काळजी कशी घ्यावी?
याविषयी कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. वर्षा चित्तीवाड यांची विशेष मुलाखत
नाशिक – उन्हाळ्यात अनेकदा त्वचा कोरडी होते, त्वचेवर मुरुमे, पिंपल्स येतात. प्रखर उन्हामुळे त्वचा लाल होते, खाज सुटते तसेच केसांच्या समस्या ही डोकं वर काढतात. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की अनेकांपुढे हा प्रश्न असतो की त्वचेची, केसांची उन्हापासून कशी काळजी घ्यायची. बऱ्याचदा अनेक जण घरच्या घरी काही उपाय करतात. पण असे उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
यंदा उन्हाचा तडाखाही जाणवत आहे. म्हणूनच त्वचेचे , केसांचे आरोग्य कसे जपावे हे कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. वर्षा चित्तीवाड यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. डॉ वर्षा चित्तीवाड या गेल्या ७ वर्षांपासून नवीन सिडको येथील श्रीनिवास मल्टीस्पेशालिटी नर्सिंग होममध्ये कार्यरत आहेत. आयुर्वेद या विषयातून त्यांनी पदवी मिळवली आहे. तसेच सौंदर्यशास्त्राच्या त्या अभ्यासक आहेत. शारीरिक दुखण्यावर इलाज करण्यासाठी सुगंधी झाडापाल्याचा रस आणि तेल यांचा वापर करून उपचारपद्धती यावर त्यांचा अभ्यास आहे. शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. मुलाखत सुरू होताच आपल्याला नोटिफिकेशन मिळेल.
https://fb.me/e/4DZA56p2C?ti=wa